जळगाव : जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी, विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दोन दिवस संवाद साधला. शिक्षणासोबतच जिल्ह्यातील प्लॅस्टिक इंडस्ट्रीसमोरील समस्या उद्योजकांनी मांडल्या. यात वकील, डॉक्टर, शिक्षण, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, अभियंते, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कलावंत, खेळाडू, अशासकीय सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, प्रसारमाध्यम यांच्याबरोबर त्यांच्या विषयांशी निगडित विषयावर चर्चा केली.
त्यांच्या समस्या व मागण्या जाणून घेतल्या. तसेच स्थानिक विषयांबाबत त्यांनी प्रशासनास कार्यवाहीबाबत सूचना केल्या. जे विषय शासनस्तरावर आहेत त्या संदर्भात पाठपुरावा करू, असे राज्यपालांनी या वेळी सांगितले. (problem of education sector plastic industry Measures suggested by Governor)