भडगाव : जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत तब्बल एक हजार ३५९ गावांना पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी एक हजार २३४ कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र, दीड ते दोन वर्षांत केवळ २९५ योजनाच पूर्णत्वास आल्या. पाणीपुरवठा योजनांना गती न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. बिलांसाठी ठेकेदारांना जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवावे लागत असल्याने पाणीपुरवठा योजनांना ‘ब्रेक’ लागल्याचे बोलले जात आहे. (break to water supply schemes in district)