Jalgaon Bribe Crime : मुक्ताईनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तीन दिवसांपूर्वीच पोलिस उपनिरीक्षक आणि चार पोलिस कर्मचाऱ्यांनी गुटख्याची वाहतून करणारे वाहन थांबविले व कारवाईचा धाक दाखवून तोडपाणी करून सोडून दिले. तेच वाहन पुढाऱ्याने पकडून पोलिस ठाण्यात आणले व घडल्या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार केली. त्या तक्रारींवरून उपनिरीक्षक व चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. (4 employees of Muktainagar police station suspended including sub inspector )