Bailpola Festival : आपल्यासोबत शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. दोन दिवसांवर असलेल्या पोळ्यात बैलांना लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी येथील बाजारात शेतकऱ्यांची धावपळ दिसून आली. मात्र, बैलांचा साजसह इतरही वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने बैलपोळ्यावर महागाईचे सावट दिसून येत आहे. मागील वर्षी खरीप हंगामाची पूर्णपणे वाताहात झाल्याने शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे आले नाहीत. (bull market prices of commodities also increased along with slow pace of inflation )