जळगाव : येथील मेहरूण तलावावर शनिवारी (ता. १२) विजयादशमीनिमित्त रावण दहनाचा कार्यक्रम होणार असून, यंदा ५१ फुटी रावणाचे दहन केले जाणार आहे. रावण दहनाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती एल. के. फाउंडेशनचे पियूष कोल्हे यांनी दिली. विजयादशमीला सायंकाळी सहाला मान्यवरांच्या हस्ते या नेत्रदीपक सोहळ्याला सुरवात होईल. रावणाची ५१ फुटांची प्रतिकृतीला डिजिटल लूक देण्यात आला आहे. त्यावर लोखंडी रॉड, कापड व कडव्याचा वापर केला आहे. (jalgaon Burning of 51 feet Ravan today )
विशेष म्हणजे, यंदा मेहरुण तलावावर जळगावकरांना विदेशात होणारा फायर शोभता येणार आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई देखील राहणार असल्याची माहिती एल. के. फाउंडेशनचे पियूष कोल्हे यांनी माहिती दिली. रावणाचे दहन शनिवारी (ता. १२) सायंकाळी सहाला होणार आहे. रावणाची प्रतिकृती तयार करण्याचे काम जळगावमधील कारागिरांच्या माध्यमातून केले आहे. (latest marathi news)
सुरवातीला ४० ते ४५ मिनिटे संगमनेर येथील ‘फटाके शो’ सादर होणार आहे. यात ५०० पासून हजार शॉट्स असलेले फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. दरम्यान, रावण दहनाच्या कार्यकक्रमाला जास्तीत जास्त जळगावकरांनी उपस्थित राहून नेत्रदीपक आतषबाजीचा आनंद घ्यावा, असे आवाहन एल. के. फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
खोटेनगरात २५ फुटी रावणदहन
खोटेनगर परिसरातील सुरक्षानगर मित्रमंडळातर्फे यंदा २५ फूट रावणाचे दहन केले जाणार आहे. गेल्या ३० वर्षांपासून मंडळातर्फे रावणदानाच्या कार्यक्रम आयोजित केला जात आहे. रावणाची भव्य प्रतीकृती साकारण्याचे काम सुरू आहे. रात्री नऊला दहनाचा कार्यक्रम आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते होईल. मेहरून तलाव येथे देखील रावण दहनाची जय्यत तयारी सुरू आहे. शहरात ठिकठिकाणी रावणदानाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.