जळगाव : साडेतीन मुहूर्तापैकी एक विजयादशमीचा सण जळगावकरांसाठी यंदा वेगळा आनंद घेऊन आला. दरवर्षाप्रमाणे होणारे रावणदहन कार्यक्रमात यंदा फायर शोची मेजवानी जळगावकरांनी अनुभवली. दरवर्षी नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येतात. त्या प्रमाणे यंदा विद्युत कळ दाबून रावण दहन सोहळा पार पडला. शहरातील एल. के. फाउंडेशनतर्फे आयोजित रावण दहन कार्यक्रमाचे यंदा चौदावे वर्ष होते. (Burning of seventy foot Ravana at press of button Spectacular fireworks over Mehrun Lake )
यापूर्वी पारंपरिक पद्धतीने रावणाच्या पुतळ्याच्या दिशेने बाण सोडून रावणाचे दहन होत होते. यंदा मात्र विद्युत कळ दाबून सत्तर फूट उंच रावणाला अग्नी देण्यात आला. शनिवारी (ता.१२) रात्री आठला आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, ललित कोल्हे, सिंधू कोल्हे, माजी महापौर आशा कोल्हे आदी मान्यवरांच्या हस्ते विद्युत कळ (इलेक्ट्रीक स्विच) दाबून रावण दहन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर सुनील महाजन, अभिषेक पाटील, योगेश देसले, चंदन कोल्हे, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बेर्डे, डॉ. वेभव पाटील. पीयूष कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. (latest marathi news)
जळगावकरांची अलेाट गर्दी
जळगाव शहरातील मेहरुण चौपाटीवरील रावणदहनचा कार्यक्रम हा अनेक वर्षांपासून परंपरेने होत आहे. यापूर्वी स्थानिक प्रशासन या कार्यक्रचे आयोजन करत होते. परिणामी पिढीजात पद्धतीने जळगावकर रावणदहन कार्यक्रमासाठी हजर राहत असल्याने यंदाही मेहरुण तलावाच्या चौपाटीवर चारही बाजूने जळगावकर तरुणांसह नागरिक महिला वर्गाची मोठी उपस्थिती राहिली.
फायर-शो लक्षवेधी
यंदा पावसाळा चांगला झाल्याने मेहरुण तलाव चारही काठांनी पूर्ण भरलेले आहे. रावणदहन कार्यक्रमात आयोजित ‘फायर शो’द्वारे अवकाशात सोडण्यात आलेल्या रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीचे प्रतिबिंब तलावाच्या पाण्यात उठून दिसत होते. आकाश आणि पाण्यातही विद्युत रोषणाईचे प्रतिबंब पाहण्याचा वेगळा आनंद यावेळेस जळगावकरांना लुटता आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.