Jalgaon News : कूलरमध्ये पाणी टाकाणे बेतले जिवावर! शॉक लागून बसचालकाचा मृत्यू

Jalgaon News : शहरातील बिबानगर येथे ४८ वर्षीय एसटीचालक घरी कूलरमध्ये पाणी ओतत असतानाच त्यांना विजेचा जोरदार धक्का लागून बाजूला फेकले गेले.
Bhaskar Borse
Bhaskar Borseesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील बिबानगर येथे ४८ वर्षीय एसटीचालक घरी कूलरमध्ये पाणी ओतत असतानाच त्यांना विजेचा जोरदार धक्का लागून बाजूला फेकले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर डोळ्यांदेखत दुर्घटना घडल्याने वडिलांना वाचलिण्यासाठी धावून आलेला मुलगा थोडक्यात बचावला. भास्कर आत्माराम बोरसे (वय ४८, मूळ रा. कठोरा, ता. जळगाव, हल्ली मु. बिबानगर, जळगाव) असे मृत बसचालकाचे नाव आहे. (Jalgaon Bus driver died due to severe electric shock)

राज्य परिवहन महामंडळामध्ये भास्कर बोरसे चालक म्हणून कार्यरत होते. मूळ कठोरा येथील रहिवासी भास्कर बोरसे यांनी मुलांचे शिक्षण आणि ड्यूटीमुळे जळगावात बिबानगर येथे नुकतेच घर घेतल्याने ते या ठिकाणी स्थलांतरित झाले होते. शनिवार (ता. १) दुपारी दीडला ते ड्यूटीवरून घरी परतले. प्रचंड उकाड्यात कूलरही काम करत नाही म्हटल्यावर त्यांनी पाहिले तर कूलरमध्ये पाणी कमी होते.

यामुळे कूलरमध्ये पाणी ओतताना त्यांना कूलरचा जोरदार धक्का लागून ते दूरवर फेकले गेले. त्यात ते जागीच बेशुद्ध पडले. घडलेला प्रकार डोळ्यांनी बघत असलेल्या मुलाने वडिलांना वाचविण्यासाठी धाव घेतली. त्यालाही धक्का लागला, मात्र तो थोडक्यात बचावला. या प्रकारामुळे बोरसे यांच्या घरात एकच आरडाओरड ऐकून शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेतली. तत्काळ बोरसे यांना जिल्‍हा रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

रुग्णालयात गर्दी

भास्कर बोरसे यांना रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित करताच त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यावर एस. टी. आगारातील चालक-वाहकांसह कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (latest marathi news)

Bhaskar Borse
Jalgaon Lok Sabha Constituency : राजकारणात मैत्री जपत मित्राला केले आमदार, खासदार

बोरसे स्वतः वायरमन

मृत भास्कर बोरसे आयटीआय वायरमन झालेले असून, त्यांनी अनेक वर्षे वायरमन म्हणूनही काम केले आहे. स्वतः भास्कर बोरसे वायरमन असताना थोड्या निष्काळजीमुळे आज त्यांच्या जिवावर बेतल्याचे परिचितांनी रुग्णालयात माहिती देताना सांगितले.

नागरिकांना आवाहन

उन्हाळा सुरू झाल्यापासून कूलरचा शॉक लागून मृत्युमुखी पडल्याची ही तिसरी-चौथी घटना आहे. शहराचे तापमान ४७ अशं सेल्सिअसपर्यंत उच्चांक गाठत असताना सर्वसामान्यांना कूलरचाच आसरा आहे.

त्यामुळे आपापल्या घरातील कूलर (डेझर्ट-प्लॅस्टिक)ची अर्थिंग व्यवस्थित तज्ज्ञ वायरमनकडून तपासून घ्यावी. वेळोवेळी पाणी टाकताना कूलरचा वीजपुरवठा बंद करून व कूलरची पिन सॉकेटमधून बाहेर काढूनच पाणी ओतावे. यामुळे दुर्घटना घडणार नाही, असे आवाहन करण्यात येत आहे.

Bhaskar Borse
Jalgaon News : लोणचे बनविण्यासाठी गृहिणींची लगीनघाई; सोमवारच्या आठवडे बाजारात गावरान कैऱ्या झाल्या आंबट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.