पारोळा : येथील बसस्थानक ‘बीओटी’ तत्त्वावर बांधण्यात आले. मात्र, या ठिकाणी आगार नाही. काही वर्षांपूर्वी स्वामी समर्थ ग्रुपने प्रवाशांसाठी जलमंदिर उभारले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता बसस्थानक परिसरात कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने आपली तहान भागविण्यासाठी प्रवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागते नाही तर मोठी कसरत करावी लागत आहे. सोबतच बसगाड्यांचे बिघडलेले वेळापत्रक, हिरकणी कक्षासह आदी सुविधा नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. (bus station at parola is in bad condition many problems )
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वर जळगाव ते धुळे या दरम्यान पारोळा शहर आहे. पारोळा बसस्थानकातून अमरावती, जालना, अमळनेर पुणे, मुंबई अशा लांबपल्ल्यांच्या बसगाड्या धावतात. लांबपल्ल्यांसह जळगाव, धुळे, नाशिक, साक्री, सुरत व ग्रामीण भागातून रोजच साधारणपणे तिनशे फेऱ्या होतात. त्यातून शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे सात ते आठ हजार प्रवासी प्रवास करतात. ग्रामीण भागातील पासधारक विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दीड ते दोनहजार आहे.
त्यातच शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अमळनेर आगारातून नऊ बसगाड्या, एरंडोल आगारातील सात बस पारोळा येथे मुक्कामी असतात. दरम्यान, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्थेसह आरक्षणाची सोय नसल्यानेअनेकजण बसकडे पाठ फिरवीत खासगी वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून बसस्थानकात हिरकणी कक्ष, वाहक व चालकांसाठी कोणत्याही सुविधा नसल्यामुळे संबंधितांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच बसस्थानक आवारातील रस्त्याची कामे झालीत. मात्र, अनेक खासगी दुचाकी व चारचाकी वाहने बसस्थानकाच्या आवारात लावलेली राहतात. त्यामुळे बसगाड्यांना स्थानकात येताना व बाहेर जाताना अनेक अडचणी येत आहेत. त्यातच सणासुदीच्या काळात बसस्थानकात योग्य ती सुरक्षाबाबत उपाययोजना होत नसल्याने बऱ्याचदा प्रवाशांची दागिने व इतर साहित्य चोरीचे प्रकार होत असतात. त्यामुळे आवश्यक ती उपाययोजना बसस्थानक परिसरात करण्यात आवश्यकता आहे. (latest marathi news)
बसस्थानकात या सुविधांची गरज!
-प्रवाशांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था
-बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी स्वच्छतागृह
-अद्ययावत हिरकणी कक्ष
- अद्ययावत उपहारगृहाची सुविधा
- बस फेऱ्यांचे वेळापत्रक
-प्रवाशांसाठी पंखे व दिव्यांची व्यवस्था
- खासगी वाहनांना मज्जाव
''पारोळा बसस्थानक हे अमळनेर आगाराअंतर्गत आहे. आगारप्रमुख म्हणून मी दोन महिन्यांपूर्वीच पद् भार स्वीकारला आहे. तरीदेखील पारोळा बसस्थानकात प्रवाशांना लागणाऱ्या सुविधांबाबत वरिष्ठांशी पत्रव्यवहार सुरू आहे. त्यातच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबत लवकरच अंमलबजावणीसाठी वरिष्ठांना कळविले जाईल. प्रवाशांनी सणासुदीच्या दिवसांत योग्य ती काळजी घेऊन आपला प्रवास सुखकर करावा.''-प्रमोद चौधरी, व्यवस्थापक, अमळनेर आगार
''गेल्या अनेक वर्षांपासून एसटीशी आपले नाते दृढ झाले आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनासाठी पारोळा बसस्थानकात योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी दूर व्हाव्यात.''- सकवार पाटील, ज्येष्ठ नागरिक तथा प्रवासी, पारोळा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.