Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात मतदानाचा वाढलेला साडेचार टक्का कुणाला फायदा देणार?

Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभा निवडणूकीची विजयाचे गणित जळगाव शहराच्या मतावर अवलंबून असल्याचे दिसत आहे.
smita wagh and karan pawar
smita wagh and karan pawar esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभा निवडणूकीची विजयाचे गणित जळगाव शहराच्या मतावर अवलंबून असल्याचे दिसत आहे. गेल्यावेळी युतीचे उमेदवार उन्मेश पाटील यांना शहरातून मिळालेला ७१ हजार ७१३ मताधिक्यावरच भाजपची मोठी भिस्त आहे. तर महाविकास आघाडीचे यावेळी झालेले नवीन समीकरण तसेच मुस्लीम मतदारांची मिळालेली भक्कम साथ यावर त्यांना विजयाची आशा आहे. त्यामुळे शहराच्या मतदानात वाढलेली ४.४१ टक्के मते कुणाला फायदा व कुणाला धक्का देणार याकडेच आता लक्ष आहे. (calculation of victory in Lok Sabha election seems to depend on vote of city )

जळगाव लोकसभा मतदारसंघातील जळगाव शहरात यावेळी एकूण ५३.५५ टक्के मतदान झाले आहे. गेल्यावेळी सन २०१९ मध्ये ४९.१४ टक्के मतदान झाले होते. शहरात यावेळी एकूण ३ लाख ८६ हजार ७३४ मतदार आहेत. त्यापैकी २ लाख १४ हजार ५४८ मतदान झाले आहे. यात १ लाख १७ हजार ४२९ पुरूष व ८७ हजार ११६ महिलांनी तर ३ तृतीय पंथीयांनी मतदान केले आहे. यावेळी मतदानाचा टक्का हा ४.१९ ने वाढला आहे.

वाढलेल्या टक्केवारीत उमेदवारांच्या विजयाचे गणितही बांधले जात आहे. सन २०१९ च्या निवडणुकीच्या निकालात जळगाव शहरातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उन्मेश पाटील यांना ७ लाख १३ हजार ८७४ मते मिळाली होती, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना ३ लाख २ हजार २५७ मते मिळाली होती. तब्बल ७१ हजार ७१३ मतांचा लीड भाजपचे उन्मेश पाटील यांना होता. (latest marathi news)

smita wagh and karan pawar
Jalgaon Lok Sabha Constituency : एकनाथ खडसे- फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार? भुसावळात आज सभा

उन्मेश पाटील यांना शहरात ६६.२२ टक्के तर गुलाबराव देवकर यांना २८.०४ टक्के मिळाली होती. टक्केवारीतील मोठ्या फरकामुळेच मतदानावर मोदी फॅक्टरचा मोठा प्रभाव दिसून आला आहे. जळगाव शहरात सन २०२९ च्या निवडणूकीत मिळालेल्या भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या ७१ हजार ७१३ मतांच्या मताधिक्यावर यावेळीही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार स्मिता वाघ यांची भिस्त निश्‍चित आहे.

विरोधी शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार करण पवार यांना शहरात ७१ हजार ७१३ मताधिक्य भरून काढून पुढे जायचे आहे. मात्र भारतीय जनता पक्षाने केवळ गेल्या वेळेच्या मताधिक्यावर न राहता यावेळी जोरदार प्रचार केला आहे. शहरात पक्षाची बुथ रचना ही मोठी जमेची बाजू आहे. मात्र यावेळी मतदान वाढले असले तरी राज्यात करण्यात आलेली पक्ष फोडीबाबत मतदारांची नाराजी, पंतप्रधान मोदी यांच्या कामावर नाराज असलेला मतदार यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

तर विरोधी पक्षाला शहरात मोदीच्या कामावर नाराज असलेल्या मतदारांची मिळालेली एक गठ्ठा मते विजयाकडे घेऊन जाणारी आहेत. मात्र शहरी भागात मतदान बुथच्या नियोजनाचा अभाव हा विरोधी पक्षाच्या मतांची वजाबाकी दाखवित आहे. त्यामुळे जळगाव शहरात वाढलेले साडेचार टक्के मतदान भाजपच्या की शिवसेना (उबाठा) पक्षाच्या पथ्यावर पडले, हे मात्र चार जुन रोजी होणाऱ्या मतमोजणीतच उघड होणार आहे.

smita wagh and karan pawar
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभेतील वाढलेला टक्का कुणाला ठरणार फायदेशीर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.