फत्तेपूर (ता. जामनेर) : नांद्रा हवेली येथील एका शेतकऱ्यास घरकुलाचे धनादेश न टाकता मानसिक त्रास दिला व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिला सरपंचांच्या मुलाविरोधात फत्तेपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ईश्वर दयाराम तायडे (वय ५०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृत ईश्वर तायडे यांचा मुलगा अमोल तायडे यांनी फत्तेपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, वडील ईश्वर तायडे, आई सुनंदा तायडे व अमोल स्वतः नांद्रा हवेली येथे राहतात. (case has been registered against Sarpanch son for abetting suicide )
शेती व शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा मोठा भाऊ संतोष तायडे पुणे येथे कंपनीत नोकरी करतो. घरकुल मिळावे, म्हणून नांद्रा हवेली ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आहे. मंजूर केलेल्या जागेवर आम्ही घर बांधले. वेळोवेळी ईश्वर तायडे यांनी ग्रामपंचायतीकडे धनादेश टाकण्याची मागणी केली. महिला सरपंच चंद्रभागाबाई पाटील वयस्कर असल्याने त्यांचा मुलगा नितीन पाटील (वय ४०) कारभार पाहतात. त्यांनी धनादेश तर टाकलेच नाहीत, उलट फत्तेपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
१ तारखेला पुन्हा धनादेशाबाबत विचारणा केली असता, पोलिस ठाण्यात तक्रार केली. फत्तेपूरला मंगळवारी (ता. ८) जाण्यासाठी सोबत येणाऱ्या लोकांना संशयित नितीन पाटील यांनी धमकावले. अमोलच्या म्हणण्यानुसार माझ्या वडिलांना मानसिक त्रास झाला, म्हणून त्यांनी आमच्याच शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत फत्तेपूर पोलिसांनी संशयित नितीन पाटीलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फत्तेपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.