Jalgaon News : चाळीसगाव की भडगाव? RTO कार्यालयाबाबत संभ्रम कायम; आमदार चव्हाणांच्या प्रयत्नांना यश मिळणार

Jalgaon News : ‘आरटीओ’ कार्यालय चाळीसगावला होणार की भडगावला होणार, याबाबत संभ्रम मात्र कायम आहे.
MLA Mangesh Chavan
MLA Mangesh Chavanesakal
Updated on

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘आरटीओ’ कार्यालय मंजूर करून आणल्याच्या वृत्तानंतर विशेषतः भडगावमध्ये त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. या पार्श्‍वभूमीवर आमदार किशोर पाटील यांनी हे कार्यालय भडगावलाच होईल, असे सांगितले आहे. दुसरीकडे चाळीसगावला ‘आरटीओ’ कार्यालयातील ४६ पदे भरण्याला मंजुरी मिळाल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यामुळे ‘आरटीओ’ कार्यालय चाळीसगावला होणार की भडगावला होणार, याबाबत संभ्रम मात्र कायम आहे. (Jalgaon RTO office MLA mangesh Chavan marathi news)

चाळीसगावला ‘आरटीओ’ कार्यालय होण्यासाठी आमदार चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र दिले होते. त्या पत्रावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘तत्काळ मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा’ असे आपल्या हाताने लिहून दिले. याशिवाय आमदार चव्हाण यांच्या कामाचा अनुभव पाहता, ते जे काम हाती घेतात ते पूर्ण करतात असे आतापर्यंत तरी दिसून आले आहे.

त्यामुळे ‘आरटीओ’ कार्यालय हे चाळीसगावला होणार आहे, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. मात्र, दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांनी देखील यापूर्वीच या कार्यालयासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार, जागेची पाहणी देखील करण्यात आली होती.

त्यामुळे नेमके ‘आरटीओ’ कार्यालय कुठे मंजूर झाले आहे, याची ठोस माहिती अद्यापपर्यंत तरी कोणाकडूनच मिळू शकलेली नाही. भडगावकरांच्या म्हणण्यानुसार, भडगाव ते जळगाव व भडगाव ते चाळीसगावचे अंतर पाहता, हे कार्यालय चाळीसगावला झाले तर त्याचा भडगावकरांना काहीच फायदा होणार नाही.

त्यामुळे भडगावातच कार्यालय झाले पाहिजे. यासाठी दोन दिवसांपूर्वीच भडगावकरांनी रास्ता रोको आंदोलन देखील केले होते. एकूणच या विषयावर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी काहीही माहिती सांगायला तयार नाही. त्यामुळे सध्या तरी ‘आरटीओ’ कार्यालयाबाबत संभ्रमच आहे. (Latest Marathi News)

MLA Mangesh Chavan
Spirituality and Religion : ‘धर्मो रक्षति रक्षितः।’

चाळीसगावात शक्यता अधिक

आमदार चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असले तरी त्यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी असलेली जवळीक पाहता, त्यांनी चाळीसगावला ‘आरटीओ’ कार्यालय होण्यासाठी केलेला पाठपुराव्याला जवळपास यश आलेले आहे. प्राप्त माहितीनुसार, चाळीसगावच्या ‘आरटीओ’ कार्यालयासाठी ४६ पदे भरण्याची प्रक्रिया देखील राबवली जात आहे.

अर्थात या संदर्भात अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही. शिवाय या कार्यालयासाठी आवश्‍यक असलेल्या योग्य त्या स्तरावरील विविध मान्यता देखील मिळविण्यात आमदार चव्हाण यांना यश आले आहे. त्यामुळे ‘आरटीओ’ कार्यालय चाळीसगावातच होण्याची शक्यता सध्या तरी अधिक दिसून येत आहे.

MLA Mangesh Chavan
Nashik News : राज्यघटनेमुळेच देशात आज एकजूट : न्या. भूषण गवई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.