गणपूर (ता. चोपडा) : कधी काळी खेड्यांमध्ये आणि शहरातही ५० लोकांचे कुटुंब एकत्रित नांदत असे. घरात एकच कारभारी राहत असे. तो घराचा कारभार पाहून संसार गाडा पुढे नेई. मात्र काळ बदलत. घरात जन्मणारी डझनभर मुलांचे प्रमाण खाली येत येत आता दोनाचे एकावर आले. त्यामुळे मूल मोठे होऊन शिक्षण, लग्न होऊन बाहेर गेल्यामुळे गावगाड्यात बदल होऊन आता गावागावात, घराघरांत दोनच जीव दिसू लागले. जणू काही ग्रामीण राहणीमानाचा सेतू पुढे नेणारी यंत्रणाच कोलमडली. (Change in village life system)