Smart Watches : 3 दशकांतील बदल; शरीरातील बीपी, तापमान, हृदयाचे ठोकेही मोजण्याची सोय

Smart Watches : गेल्या दोन, तीन दशकांचा विचार करता मनगटी घड्याळे वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. मात्र हा वापर पुन्हा वाढत असला तरी अँड्रॉइड स्मार्ट वॉच वापरण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये प्राधान्याचे वाढत असल्याचे दिसून आले आहे.
Changed look of the watch
Changed look of the watchesakal
Updated on

Smart Watches : गेल्या दोन, तीन दशकांचा विचार करता मनगटी घड्याळे वापरण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसते. मात्र हा वापर पुन्हा वाढत असला तरी अँड्रॉइड स्मार्ट वॉच वापरण्याचे प्रमाण नागरिकांमध्ये प्राधान्याचे वाढत असल्याचे दिसून आले आहे. साधारणपणे ऐंशी-नव्वदच्या दशकात मनगटी घड्याळ वापरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. त्या काळी साधारणपणे साठ टक्के लोकांच्या हातात मनगटी घड्याळ दिसून येत असे. त्यामुळे वॉच रिपेअर आणि घड्याळींच्या स्पेअर पार्ट आणि पट्टा विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर दिसून येत. (Changes in 3 decades of watches facility to measure body BP temperature and heart rate )

शिवाय त्यांचा व्यवसायही मोठा होता. रिको, सिको, टायटन, हॅंडोसँडो, एचएमटी, टाईमस्टार तीन काट्यांच्या घड्याळी अधिक वापरल्या जात असत. त्या काळी जपान मेड घड्याळे वापरण्याकडेही काहीसा कल होता. त्या नंतरच्या काळात फक्त वेळ दाखविणाऱ्या आणि सेल असलेल्या हलक्या वजनाच्या घड्याळी मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेल्या. मात्र अलीकडच्या काळात दोन हजारांपासून दहा हजार रुपयांपर्यंत किंमत असलेल्या अँड्रॉइड स्मार्टवॉच वापरणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

या घड्याळांमध्ये विविध फंक्शन असल्यामुळे मधल्या काळात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे आणि त्यात वेळ समजत असल्याने घड्याळी वापरण्याचे कमी झालेले प्रमाण वाढू लागले आहे. दोन दशकांपूर्वी मोबाईलमध्ये घड्याळ होती. आता घड्याळमध्ये मोबाईल आल्याचा जमाना आला आहे. अँड्रॉइड स्मार्टवॉचमध्ये फोटो सेव्ह करता येण्याची ही सुविधा असून, आपल्या खिशातला मोबाईल फोन त्याला कनेक्ट करता येत असल्याने चारचाकी वाहन चालविताना किंवा बाईक चालविताना फोनवरून येणारा फोन मनगटी घड्याळवरही ऐकता येण्याची सोय या मोबाईलमध्ये आहे. (latest marathi news)

Changed look of the watch
Smart watch : स्मार्ट वॉच खरेदी करताना काय काळजी घ्याल ?

अशा प्रकारच्या बऱ्याच मोबाईलची संख्या वाढत असून, मनगटावर काळाकुट्ट काच दिसणाऱ्या घड्याळी नजर जाताच वेळ दाखवतात. या घड्याळींमध्ये आपल्या शरीरातला बीपी, टेंपरेचर, रनिंग होत असलेली पावले, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके मोजण्याची सोय असते. एवढेच काय तर या घड्याळीमधून दररोज हवामानाचा अंदाजही समजतो. आता त्यात कॅमेरा व म्युझिक प्लेअर आले असून, मधल्या काळात मोबाईलमध्ये गेम पाहणाऱ्या लहान मुलांसाठी आता या घड्याळींमध्ये विविध खेळ (गेम) येऊ लागले आहेत.

फ्लॅश लाईटसह मिळणाऱ्या या घड्याळी वॉटरप्रूफ असून, पाण्यातही पडल्या तरी खराब होत नसल्याने वापरणाऱ्यांच्या पसंतीला त्या आता उतरू लागल्या आहेत. एकंदरीत पाहता १९६० ते १९९० च्या दशकापर्यंत स्टील पट्टा असलेल्या, कड्यांच्या, सोनेरी पट्टा आणि काट्यांच्या घड्याळींचे वापराचे प्रमाण अधिक होते.

त्यानंतरच्या काळात हलक्या वजनाच्या आणि फक्त वेळ दर्शवणाऱ्या घड्याळी वापरात खूप आल्या. पुढे पुढे तर त्या किलो प्रमाणे मिळू लागल्याने वीस रुपयांपासून हजार रुपयापर्यंत मिळू लागल्या. मात्र हा जमाना आता मागे पडला असून, लूक बदललेल्या स्मार्ट वॉचमध्ये सर्व सुविधा असल्याने त्या वापरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून आले आहे.

Changed look of the watch
Best Smart Watches : विविध प्रकारचे फिचर्स आणि दमदार क्वालिटीसाठी ‘या’ स्मार्टवॉचेसची करा निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.