जळगाव : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील 'शिवाई देवराई' आणि वन उद्यानाचे लोकार्पण शिवजयंतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री गिरीश महाजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिली. (Jalgaon Chhatrapati birthplace Shivay devrai marathi News)
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत वन विभागात तर्फे पहिल्या टप्पात अडिच एकर क्षेत्रावर तीन वन उद्यान आणि शिवाई देवराई साकारण्यात आली आहे. पुढील विविध टप्प्यांमध्ये हे क्षेत्र २५ एकरपर्यंत वाढविणार आहोत. देवराईची संकल्पना सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने मांडली होती.
संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सुक्ष्म आणि ठिबक सिंचनाची यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मुळे शिवनेरी गडावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाच्या शास्त्रोक्त वापरातून पाण्याचा संतुलित वापर होणार आहे. देवराईचा हा पहिला टप्पा असून, आम्ही हे क्षेत्र टप्याटप्याने वाढविणार आहोत. ही देवराई महाराष्ट्रातील गड किल्ले विकासात पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शक ठरेल. (Latest Marathi News)
किल्ले संवर्धनासाठी देवराई
शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पावर आम्ही प्रशासन आणि वन विभागासोबत सातत्याने काम करत आहोत. किल्ल्यावरील उपलब्ध पाण्यावर जास्तीत जास्त वनराई विकसित व्हावी; यासाठी आम्ही जैन उद्योग समूहाला विनंती केली होती. अध्यक्ष अशोक जैन यांनी ठिबक आणि सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञान शिवनेरीसाठी विनामूल्य उपलब्ध केले.
यामुळे शिवाई देवराई ही राज्यातील किल्ले संवर्धनासाठीची आदर्श देवराई ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे, असे सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर (जि.पुणे) अध्यक्ष राहुल जोशी यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले.
"‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी शिवाई देवराईच्या माध्यमातून काम करण्यास मिळाले हे आमचे भाग्य असून, सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने आम्हाला ठिबक आणि सुक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाची मागणी केली होती. ही मागणी आणि वन विभागाच्या माध्यमातून पूर्ण केली आहे."
- अशोक जैन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.