Jalgaon News : अखेर 502 कोटीच्या यावल उपसा सिंचन; योजनेस मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता

Jalgaon News : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या ५९२ कोटींच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.
Yaval Upsa Irrigation Project on Barrage.
Yaval Upsa Irrigation Project on Barrage.esakal
Updated on

Jalgaon News : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या ५९२ कोटींच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिली आहे. २७ जून २०२३ ला ‘शासन आपल्या दारी’ झालेल्या कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांनी पूर्ती केल्याबद्दल पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. (Chief Minister approved in principle 502 crore Yawal Upsa Irrigation Scheme)

पालकमंत्री पाटील यांच्या निर्देशानुसार तापी विकास महामंडळाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. मंत्री पाटील यांनी जळगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी साकडे घातले होते. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला असून, वचनपूर्ती केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना हा प्रकल्प वरदान ठरणार आहे.

यावल तालुक्यातील बहुतांश क्षेत्र सीजीडब्लयू अहवालानुसार भूजल वापरदृष्ट्या डार्क झोनमध्ये येते, तसेच शेळगाव बॅरेजच्या जलाशयापासून १६ किलोमीटर दूर व १०० मीटर उंचीवरील यावल तालुक्यातील अधिसूचित क्षेत्राला शेतकरी वैयक्तिकरित्या पाणी उपसा करू शकत नव्हते. शेळगाव बॅरेजवर आतापर्यंत ९०० कोटींचा खर्च झाला असला, तरी हजारो शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध असूनही केवळ यावल उपसा सिंचन योजनेस मंजुरी नसल्यामुळे आपले क्षेत्र ओलिताखाली आणता येत नव्हते. मात्र, या उपसा सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने शेळगाव बॅरेजमधील विनावापर असलेले पाण्याचा वापर होऊन शेतकऱ्यांची शेती सिंचनाखाली येणार आहे. (latest marathi news)

Yaval Upsa Irrigation Project on Barrage.
Jalgaon News: वेल्डिंगचे काम करताना तिसऱ्या माळ्यावरून पडून तरुणाचा मृत्यू! अमळनेर येथील घटना; मिल चाळ परिसरातून हळहळ

९ हजार हेक्टर येणार ओलिताखाली

जळगाव ग्रामीण मतदारमतदारसंघातील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प केंद्र शासनाच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत समाविष्ट आहे. शेळगाव बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले. आतापर्यंत त्यात ५० टक्के जलसाठा झाला आहे. यंदा १०० टक्के साठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा १६६.३६६ दशलण घनमीटर आहे. यावल तालुक्यातील साकळी, नावरे, विरावली, महेलखेडी, कोरपावली, दहिगाव, वाघोदे, चुंचाळे, गिरडगाव, वढोदे, दगडी, बोराळे, शिरसाट, यावल शहर, सांगवी बुद्रुक, चितोडे, अट्रावल, सातोद, कोळवद या १९ गावांतील ९१२८ हेक्टर कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

''शेतकरीहिताच्या ५०२ कोटींच्या यावल उपसा सिंचन प्रकल्पास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर होईल. या योजनेद्वारे यावल तालुक्यातील कोरडवाहू क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाचा लाभ जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र आणि जळगाव, यावल व भुसावळ या तीन तालुक्यांतील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. भविष्यातही याच प्रकारे विविध प्रकल्पांना निधीची कमतरता पडू नाही.''-गुलाबराव पाटील, पालकमंत्री

Yaval Upsa Irrigation Project on Barrage.
Jalgaon News : मान्यता रद्द झालेल्या ‘प्रताप’मधील ‘त्या’ 17 शिक्षकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.