Jalgaon News : कळमसरे मार्गे चोपडा-नंदुरबार बस सुरू; ‘लालपरी’च्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना गिफ्ट

Jalgaon : चोपडा आगाराची एसटी बस मारवड, कळमसरे, शहापूर मार्गे सुरू झाल्याने कळमसरे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
Villagers felicitating the bus driver and carrier.
Villagers felicitating the bus driver and carrier.esakal
Updated on

Jalgaon News : चोपडा आगाराची एसटी बस मारवड, कळमसरे, शहापूर मार्गे सुरू झाल्याने कळमसरे तसेच परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. सुरवातीला ही बससेवा १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून मारवड, वासरे, खेडी मार्गाने सुरू होती. परंतु प्रवासी संख्या कमी असल्याने शिवाय बऱ्याच दिवसांपासून कळमसरे व परिसरातील ग्रामस्थांची ही बस कळमसरे मार्गे सुरू व्हावी, यासाठी आग्रही मागणीही असल्यामुळे चोपडा आगाराचे व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी एक जून एसटीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ही बससेवा सुरू केली आहे. (Chopra Nandurbar bus start to Kalamsare on occasion of Lalpari anniversary )

ही बस चोपडा आगारातून अमळनेर धार, मारवड, कळमसरे, शहापूर, बेटावद, नरडाणा, शिंदखेडा, दोंडाईचा मार्गे नंदुरबारपर्यंत धावेल. एकूणच, यामुळे थेट गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचीही सोय होणार आहे. ही बस चोपडा येथून सकाळी सातला निघेल तर नंदुरबार येथे सव्वाअकराला पोहोचेल. तर नंदुरबारहून बस परत येताना दुपारी पावणेबाराला निघेल. चोपडा येथे साडेचारपर्यंत पोहचेल. (latest marathi news)

Villagers felicitating the bus driver and carrier.
Jalgaon News : कार रेस लावणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

यात कळमसरे-मारवड येथे नंदुरबार जाताना सकाळी साडेआठपर्यंत येईल व नंदुरबारहून चोपडा जाताना दुपारी अडीच, तीनपर्यंत येईल, याची नोंद प्रवाशांनी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. ही बससेवा मारवड, कळमसरे, शहापूर येथील ग्रामस्थांच्या मागणीवरून शहापूरचे सुपुत्र महेंद्र पाटील आगार व्यवस्थापक चोपडा यांच्या प्रयत्नांनी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

येथे झाला जंगी सत्कार

कळमसरे ग्रामपंचायत व गावाच्यावतीने एसटी कर्मचारी वाहक नीतेश पाटील, चालक एम. जी. जगताप, वाहक आर. जे. पवार यांचा ग्रामपंचायत सदस्य दिनकर पारधी, विकास संस्थेचे संचालक योगेंद्रसिंह राजपूत, मधुकर पाटील, भरत महाजन, पत्रकार गजानन पाटील, विठ्ठल नेरकर, अंबालाल राजपूत, सुदाम सैंदाणे, राजेंद्र चौधरी, प्रवीण चौधरी, श्रीराम चौधरी, रामलाल पाटील आदी ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.

Villagers felicitating the bus driver and carrier.
Jalgaon News : ज्वारी खरेदीसाठी 450 शेतकऱ्यांची नोंदणी! गोदाम उपलब्ध नसल्याचा तहसीलदारांकडून खुलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.