Ladki Bahin Yojana: नारिशक्ती ॲपला कासवगतीमुळे CISC केंद्रचालक हैराण! भुसावळ शहरातील स्थिती; लाडकी बहीण अर्ज भरण्यात अडचणी

Jalgaon News : सर्व्हर डाऊनमुळे एक अर्ज भरण्यासाठी किमान १५ मिनिटे वेळ लागतो, तर यानंतर पुढील अर्ज भरलाच जात नसल्याने सीआयएससी सेंटरचे चालकही हैराण झालेले दिसून येत आहेत.
One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana
One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojanaesakal
Updated on

भुसावळ : मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून लाडकी बहीण कागदपत्र जुळवाजुळवा करण्यासाठी भटकंती करीत आहे. त्यात लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज भरताना महिलांच्या नाकीनऊ आले आहेत. लाडकी बहीण योजनेचे नारी शक्ती ॲप सुरू करण्यात आले.

मात्र, या ॲपवरुनही अर्ज भरण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सर्व्हर डाऊनमुळे एक अर्ज भरण्यासाठी किमान १५ मिनिटे वेळ लागतो, तर यानंतर पुढील अर्ज भरलाच जात नसल्याने सीआयएससी सेंटरचे चालकही हैराण झालेले दिसून येत आहेत. (CISC Center Director shocked due to slow pace of Narishakti App)

One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana
Jalgaon News : प्रहार जनशक्ती विधानसभेच्या दोन जागा लढविणार; जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे यांची माहिती

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून शहरातील महिला या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिला हैराण झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना कुठे सर्व्हर डाऊन, तर कुठे नारी शक्ती ॲप संथगतीने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे."नाव नोंदणीसाठी महिलांना सीआयएससी केंद्राबाहेर ताटकळत राहावे लागत आहे.

मध्यरात्री भरले जाताय अर्ज

भुसावळ शहरातील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही महिलांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. दिवसा सर्व्हर डाऊनमुळे अर्ज भरले जात नसल्याने आता रात्री एक ते पहाटे चार या वेळेत सर्व्हर डाऊन नसल्याने या वेळेत अर्ज भरले जात आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी व माजी नगरसेवकांनी या सुविधा दिल्याने महिलांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana
Jalgaon Political: तिजोरीत खडखडाट अन्‌ घोषणांचा पाऊस : प्रदेशाध्यक्ष पाटील यांची टीका; NCP (शरदचंद्र पवार) पक्षाचा मेळावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com