Jalgaon Election Analysis : जळगाव शहराचे पुन्हा भाजप उमेदवाराला भक्कम पाठबळ

Election Analysis : ‘भाजप’चे बूथ लेव्हलचे संघटन सक्षम आहे. मतदारांपर्यंत पोचून केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत सक्षमपणे पोचविल्या.
Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal
Updated on

Jalgaon Election Analysis : ‘भाजप’चे बूथ लेव्हलचे संघटन सक्षम आहे. मतदारांपर्यंत पोचून केंद्र शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत सक्षमपणे पोचविल्या. यामुळे जळगाव मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोणीही असता तरी त्याला मताधिक्य मिळाले असते, एवढे सक्षम पक्ष संघटन जळगाव शहर मतदारसंघात होते. त्याचाच परिणाम या निकालातूनही दिसून आला. भाजप उमेदवार स्मिता उदय वाघ यांना अडीच लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. (citizen strongly supports BJP candidate against in lok sabha election )

जळगाव शहर मतदारसंघातून त्यांना १ लाख ३२ हजार १२४ मते मिळाली. ६१ हजार ७१८ मतांचा लिड त्यांना मिळाला. जळगाव जिल्हा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या दहा वर्षांपासून जळगाव शहर मतदारसंघात भाजपचा उमेदवार आमदार म्हणून निवडून येत आहे. सोबतच जळगाव लोकसभा मतदारसंघाचा उमेदवाराला लीड देण्यात जळगाव शहर मतदारसंघाचा मोठा हातभार आहे. यंदाच्या निवडणुकीतही भाजपने हा किल्ला शाबूत ठेवला आहे. या निवडणुकीत भाजप महानगरचे पदाधिकारी, आमदारांवर मोठी जबाबदारी होती.

भाजपचे निवडणूक मॅनेजमेंट

निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सहा महिन्यांपासूनच भाजपने दहा वर्षांत केलेली विकासकामे, विविध योजना, त्यांचे लाभ, भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलेली प्रतिमा, श्री. मोदी सक्षम नेतृत्व कसे आहेत, याबाबत प्रचार, प्रसिद्धी सुरू केली होती. केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचून प्रचार सुरू केला होता. शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे वर्षात चारवेळा मिळणारा सन्मान निधीची माहिती देण्यात आली. मोंदीनी अयोध्येत तयार केलेले राममंदिर, काश्‍मीरातून हटविलेले ३७० कलम, देशाची सुरक्षा आदी मुद्यांच्या आधारे मते मिळविण्याचा प्रयत्न झाला. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Constituency
Market Committee Election Analysis : अभिजित पाटलांचे बेरजेचे राजकारण यशस्वी! प्रस्थापितांना धक्का

संघटनात्मक व्यूहरचना

संघटनात्मक व्यूहरचनाही सक्षम करून करून बूथ लेव्हलपासूनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जुने- नव्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मतदार मतदान केंद्रापर्यंत कसा पोचेल व भाजपच्या उमेदवाराला मतदान कसे करेल, यासाठी व्यूहरचना आखली होती. मतदारांशी अधिकाधिक संपर्कावर भर देण्यात आला. विविध समाज, महिला मंडळ, महिला बचत गटांच्या बैठका घेऊन मतदारांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न झाला.

मतदानाच्या तीन दिवसांपूर्वी प्रत्येक मतदाराला फोन करून भाजपला मतदान करा, असा संदेश देण्यात आला. सर्वच ठिकाणी मतदार चिठ्ठ्यावाटप करण्यात आल्या. यामुळे मतदारांना कोणत्या केंद्रावर मतदान आहे, याची माहिती मिळाली. त्यामुळे मतदान करणे सोपे झाले. भाजपच्या संघटनात्मक रचना, जुने- नव्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या टीम वर्कमुळे स्मिता वाघ यांना तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्क मिळाले.

मिळालेली मते अशी

स्मिता वाघ (भाजप) : १३२१२४

करण पवार (उबाठा) : ७०४०६

मताधिक्य : ६१,७१८

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Election Analysis : सरकारविरोधी वातावरणात भाजपचा ‘बुरुज’ चिरेबंद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.