Jalgaon News : एरंडोल शहरात विजेचा लपंडाव! वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त

Jalgaon : शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
power cut
power cutesakal
Updated on

Jalgaon News : शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात दिवसभरात पन्नास ते साठ वेळा पंधरा ते वीस मिनिटांच्या अंतरात अचानक वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे वीज उपकरणांचे नुकसान होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी वीजग्राहकांनी केली आहे. ( Citizens suffer due to frequent interruption of electricity supply)

शहरासह ग्रामीण भागात मागील एक महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होत आहे. शहरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाऊस पडल्यामुळे रात्री बारापासून सकाळी सातपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. खंडित वीजपुरवठ्यामुळे रात्रभर बालके व वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पावसाला सुरवात झाल्याबरोबर वीजपुरवठा बंद केला जात असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे लहान व्यावसायिकांचे देखील आर्थिक नुकसान होत असून, दुग्धजन्य पदार्थ देखील खराब होत असतात.शासकीय कार्यालये, बँका, टपाल कार्यालय येथील कामकाजावर देखील खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम होत असून, नागरिकांना कामासाठी तासंतास ताटकळत राहावे लागते. (latest marathi news)

power cut
Jalgaon News: मुलीला शाळेत घ्यायला गेलेली आई सापडली विहिरीत! अज्ञात महिलेने संमोहित करून नेल्याचा कुटुंबाचा आरोप

शहरात दिवसभरात पन्नास ते साठ वेळा क्षणाक्षणात वीज खंडित होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विजेचा अचानक कमीजास्त दाब होत असल्यामुळे विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याबाबत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधल्यास कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे अपेक्षित

वीज वितरण कंपनीचे अधिकारी मुख्यालयात न राहता परगावाहून ये-जा करीत असल्यामुळे त्यांनी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. वीज वसुलीसाठी ग्राहकांकडे वारंवार पाठपुरावा करणारे वीज कर्मचारी खंडित वीज पुरवठ्याकडे का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार चिमणराव पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत लक्ष घालून वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी वीजग्राहकांनी केली आहे.

power cut
Jalgaon News : राज्यात स्वच्छ, सुंदर बसस्थानकात चोपडा अव्वल; 50 लाखांचे पहिले बक्षीस जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.