Jalgaon News : खून, बलात्कार, घरफोड्यांनीच गाजवले वर्ष

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : कोरोना महामारीचा जोर ओसरत असताना वर्ष-२०२२ पूर्णपणे सामान्य परिस्थितीप्रमाणे जोशात सुरू झाले. महामारी काळात जनतेने पोलिसदलास दिलेली शाबासकीची थाप मात्र अकराच महिन्यांत फिकी पडली.

अवघ्या अकराच महिन्यांत ६७ खून, ८५ प्राणघातक हल्ले आणि साडेतीनशेवर घरफोड्यांसह विविध गुन्ह्यांचा सेनसेक्स मुसंडी मारून वर असल्याने वर्ष संपत असतानाच लूज पोलिसिंगचा धुराडा उडाला आहे.

कोरोना महामारीने उद्योगधंद्यासंह शेती व्यवसायाची पुरती वाट लावली होती. वर्ष-२०२० आणि २०२१ असे दोन्ही वर्षे कोरेाना लॉकडाउन, रुग्णालयांत गर्दी, मास्क-सॅनिटायझरसह निर्बंध आणि निर्मनुष्य परिसर बघण्यातच उलटले. ( Jalgaon city year ended under burglary murder theft rape crime Jalgaon Crime News)

Crime News
Crime News : मोबाईलवर फिल्म दाखवण्याच्या बहाण्यानं सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार; आधी टेरेसवर नेलं अन् तिथं..

निर्बंध हटविल्यानंतर (जानेवारी-२२) जळगाव जिल्‍हा पूर्वपदावर येवूऊ लागला. शेती, उद्योग व्यवसाय सुरू होऊन आर्थिक आवकला सुरवात झाली. रोजंदारीवर काम करणाऱ्या हातांना पूर्वीप्रमाणे काम मिळू लागले.

जानेवारी ते नोव्हेंबर या अवघ्या अकराच महिन्यांत मात्र गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते. सर्वच प्रकारच्या गुन्ह्यांचा याच्यात समावेश असून, भुरट्या चोऱ्या, घरफोड्या जबरी लुटीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारी वाढत असताना त्या तुलनेत ग्राउंड लेव्हलची पोलिसिंग मात्र, पुरती लूज पडल्याचे आढळून येते.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Crime News
New Year Celebration : या देशात नव्या वर्षाची सकाळ अद्याप झालीच नाही; निसर्गाची Intresting किमया!

बकाले-महाजनने घालवली पत

जिल्ह्या‍तील ३५ पोलिस ठाण्यांत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा छडा लावण्याची तत्पर यंत्रणा असलेल्या गुन्हे शाखेचा कारभार तसा बऱ्यापैकी सुरू होता. जळगावात रुजू झाल्यानंतर किरणकुमार बकाले या अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांसह २३ महिन्यांच्या कारकिर्दीत १६ क्लिष्ट खुनांचा उलगडा केला.

मात्र, जळगावची गुन्हे शाखाच मुळात शापित शाखा असल्याप्रमाणे, त्याच तेविसाव्या महिन्यांत बकालेंची डंडी उडाली. गुन्हे शाखेचा हजेरी मास्तर अशोक महाजन व बकाले यांच्यात मोबाईलवर झालेल्या संभाषणात मराठा समाजाप्रति अपमानजनक वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप कर्मचाऱ्यांनी व्हायरल करून रान उठवल्यावर बकरलेंना पायउतार व्हावा लागले. गेली चार महिने बकाले अज्ञातवासांत असून, अद्याप त्याना अटक होऊ शकली नाही. या प्रकरणामुळे राज्यभर पोलिसदलाची नाचक्की होऊन जिल्ह्याला बदनामीला समोरे जावे लागले.

सरकारचे जावई पोसणारे मुख्यालय

जिल्‍हा पोलिसदलातील कामचुकार पोलिसांना पोसण्याचा अड्डा पोलिस मुख्यालय बनले आहे. जिल्ह्यातील ३५ पोलिस ठाण्यांसह विविध सात शाखांमध्ये काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा तुटवडा असताना मुख्यालयाच्या पटावर सातशेवर पोलिस कर्मचारी स्ट्रेन्थ राखीव असून, सर्वाधीक कामचुकार पोलिस मुख्यालयांतर्गत विविध विभागात लपून बसलेले आहेत.

मुख्यालयातील हजेरी मास्तरपासून अधिकाऱ्यांपर्यंत पैसा चारून हे सरकारी जावई ऐश करत असल्याचे उघडीस आले. मुख्यालयातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांची खदखद आणि तक्रारी चव्हाट्यावर आल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी होमडीवायएसपींकडे चौकशीची सूत्रे सोपवली. नाशिक रिटर्न हजेरी मास्तराच्या नियुक्तीचे श्रेय त्यांच्याच कडे असल्याने कारवाईचा नुसताच धुव्वा उडाला.

Crime News
Nashik News: नाशिकमधील जिंदाल कंपनीत भिषण स्फोट; 25 ते 30 कर्मचारी अडकल्याची भिती

जिल्ह्या‍वरील नियंत्रण सुटले

गेल्या वर्षभरातील खून, दरोडा, घरफोड्या, बलात्कार आणि जातिय तेढ निर्माण करणाऱ्या घटनांचे अवलोकन केले असता पोलिस ठाणे पातळीवर वेळीच दखल न घेतल्याने घडलेले दंगे असोत की पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक आणि गोपनीय कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा यातून मोठ्या घटना घडून आल्याचे स्पष्टपणे जाणवते.

पोलिस निरीक्षक नियुक्त्यांमध्ये राजकीय हस्तक्षेपातून आणि आर्थिक देवाण-घेवाणीतून पोस्टिंग्स मिळाल्याने बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी पोलिसिंग करताना आढळून येतात. बाकीच्यांना कारकुनी कामातच समाधान असून, साध्या हद्दीत गस्त मारण्याचीही उसंत प्रभारी अधिकाऱ्यांनी नाही.

अकरा महिन्यांतील गंभीर गुन्हे असे (कंसात गेल्या वर्षीची तुलना)

खून - ६७ (५६)

सदोष मनुष्यवध - ८ (७)

बलात्कार - ३८ (३९)

विनयभंग - २४६ (२५०)

जबरी चोरी - ११९ (१४४)

घरफोडी - ३४६ (३६८)

एकूण चोऱ्या - १,८७८ (१,६५४)

दंगल - ३११ (३५९)

ठगबाजी - २८३ (२४२)

सरकारी नोकरांवर हल्ले - ५८ (६६)

आत्महत्येस प्रवृत्त करणे - ५४ (५०)

प्राणांतिक अपघा - ५६४ (४२२)

बाल लैंगिक अत्याचार - ९९ (७९)

बालिका विनयभंग - ५६ (५४)

प्रतिबंधात्मक कारवाई - ९,०३९ (८,७१३)

Crime News
Jalgaon News : अबब ! जात प्रमाणित करण्यासाठी 10 लाखांची लाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.