Jalgaon Rain Damage Crop : वडगाव बुद्रूक येथे ढगफुटी सदृश पाऊस; पिकांचे प्रचंड नुकसान

Rain Damage Crop : तालुक्यातील वडगाव बुद्रूकसह पंचक्रोषित रविवारी (ता.१४) पहाटे एक वाजेपासून ते सकाळी सातपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.
Heavy rains, carrying away the fertile layer of the land, causing huge damage to agriculture and crops
Heavy rains, carrying away the fertile layer of the land, causing huge damage to agriculture and cropsesakal
Updated on

Jalgaon Rain Damage Crop : तालुक्यातील वडगाव बुद्रूकसह पंचक्रोषित रविवारी (ता.१४) पहाटे एक वाजेपासून ते सकाळी सातपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दरम्यान, या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (Cloudburst-like rain at Vadgaon caused heavy damage to crops )

वडगाव बुद्रूकसह पंचक्रोषित रविवारी (ता.१४) पहाटे एक वाजेपासून ते सकाळी सातपर्यंत ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. या पावसामुळे वडगाव बुद्रूकसह परिसरात केळी पिकाची नवीन लागवड केलेली रोपे वाहून गेली आहेत. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने कापूस, मका यांच्यासह इतर पिके पाण्याखाली गेल्याने त्यांचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने बांधबंधी फुटल्या आहेत. वाहून जणाऱ्या पाण्यामुळे जमिनीचा वरचा सुपिक स्तर वाहून गेल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. (latest marathi news)

Heavy rains, carrying away the fertile layer of the land, causing huge damage to agriculture and crops
Unseasonal Rain Crop Damage : भुसावळसह 3 तालुक्यांत 1880 हेक्टरवर नुकसान; प्रशासनाचा प्राथमिक अहवाल

शेतकरी नेहमीच विविध संकटांचा सामना करीत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या खर्चात खूपच वाढ झाल्याने नफ्याचे प्रमाणात कमी आहे. विशेष म्हणजे आधीच बरीच घट झाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. आशा या बिगर छप्परचा शेती करणाऱ्या बळीराजाला या संकटात आधार देण्यासाठी शासनाने तातडीने पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत, तसेच नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी वडगाव बु।। चे माजी सरपंच तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नामदेव पाटील,प्रा.संदीप पाटील यांच्यासह पंचकृषितील शेतकऱ्यांनी केली आहे.

Heavy rains, carrying away the fertile layer of the land, causing huge damage to agriculture and crops
Jalgaon Heavy Rain Crop Damage : 6 तालुक्यांतील 4 हजार हेक्टर शेतीपिकांचे नुकसान; कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.