Jalgaon District Collector : उमेदवारांनी खर्चाचा हिशोब ठेवावा : जिल्हाधिकारी प्रसाद

Jalgaon News : जिल्ह्यातील जळगाव लोकसभेसाठी १४, तर रावेर लोकसभेसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांनी प्रचारसाठी केलेल्या खर्चाचे मोजमाप सुरू झाले आहे.
Collector Ayush Prasad
Collector Ayush Prasadesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील जळगाव लोकसभेसाठी १४, तर रावेर लोकसभेसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांनी प्रचारसाठी केलेल्या खर्चाचे मोजमाप सुरू झाले आहे. २, ७ व ११ मे, अशा तीन दिवस उमेदवारांनी त्यांचा खर्चाचा तपशील जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावयाचा आहे. (Jalgaon Collector Prasad statement Candidates should keep an account of expenses)

तो तपसाणीसाठी नाशिक इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी, जळगावचे अधिकारी असतील. तपासणीचे व्हिडिओ रेकाॅर्डिंग होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यावेळी उपस्थित होते.

श्री. प्रसाद यांनी सांगितले, की उमेदवारांना त्या-त्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा, रॅली व मेळावे घेण्याबाबतच्या विविध परवानगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मिळेल. फक्त वाहनांची परवानगी जिल्हा स्तरावरून मिळेल.

होम वोटींग ४ व ५ मेस

जिल्ह्यात १,५२५ मतदारांचे वय ८५ पेक्षा जास्त आहे. आणि त्यांना बेडवरून उठताही येत नाही, अशांनी होम वोटींग (घरूनच मतदान) करण्याची परवानगी मागितली आहे. ही मोहीम ४ व ५ मेस संबंधिताच्या घरी जाऊन पोस्टल बलेटद्वारे होणार आहे. याचे व्हिडिओ चित्रणही होईल. (Latest Marathi News)

Collector Ayush Prasad
Jalgaon Lok Sabha Constituency : जळगावात 14, रावेर मतदारसंघात 24 उमेदवार; माघारीनंतर लढतींचे चित्र स्पष्ट

अंतिम मतदारयादी तयार

आता मतदारांची अंतिम यादी तयार झाली आहे. ती उमेदवारांना उपलब्ध करून मिळेल. अंतिम मतदार यादीत एकूण ३८ लाख १५ हजार ७९६ मतदार आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात १९ लाख ९४ हजार ४६ मतदार आहेत.

त्यात १० लाख ३७ हजार ३५० पुरुष, तर ९ लाख ५६ हजार ६११ महिला व ८५ तृतीयपंथीय आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात १८ लाख २१ हजार ७५० मतदार आहेत. यात ९ लाख ४१ हजार ७३२ पुरुष, तर ८ लाख ७९ हजार ९६४ महिला व तृतीयपंथीय ५४ मतदार आहेत.

नवमतदारांची संख्या ५७ हजार

१८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या ५७ हजार ३४२ आहे. ५ ऑगस्ट २०२३ ला ही संख्या १६ हजार होती. मतदार नोंदणीसाठी मोहीम राबवून ही संख्या आता ५७ हजार ३४२ वर पोचली आहे. ८ हजार ४३३ सैन्य दलातील मतदार आहेत. सर्वाधिक मतदार पाचोरा येथे २०१४ आहेत. या मतदारांना इलेक्ट्रानिक ट्रान्सफर पोस्टल बलेटद्वारे मतदानाची सोय आहे.

Collector Ayush Prasad
Jalgaon News : ‘त्या’ पाचशेवर ॲप्रेंटिसधारकांना मिळाला न्याय! रक्षा खडसेंबद्दल कृतज्ञता व्यक्त

जनजागृतीपर उपक्रम

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहे. आता ‘मिकी-माऊस’चा टेडी असलेले बालके अनेक ठिकाणी जाऊन मतदानाची जनजागृती करतील. लहान मुले मतदारांना मतदानाचे महत्त्व सांगतील. १३ मेस मतदान केंद्रावर आईबाबांना मतदानासाठी घेऊन या, असा संदेश देतील. लहान मुले मतदानाच्या दिवशी पालकांकडे ‘मिकी माऊसट’ला भेटायला मतदान केंद्रावर चला, असे सांगतील व मतदानासाठी ते मतदान केंद्रावर येतील.

भरिताची रेसीपी

जळगावला भरीत प्रसिद्ध आहे. त्याची रेसीपी काय आहे. याचा व्हिडिओ बनवून त्या रेसिपीसोबत मतदानाचे महत्व, मतदानाची किती सोपी प्रकिया आहे, याबाबत सात मिनिटांची व्हिहिओ तयार केला आहे. तो सर्व महिला मतदारांपर्यंत पोचवून ते मतदानाला येतील, अशी आशा आहे.

Collector Ayush Prasad
Jalgaon Lok Sabha Constituency : अमळनेरातील विरोधक ‘दादा’ ताईसाठी आले एकत्र!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.