Jalgaon News : उन्हाळ्यातील उष्माघात या विषयी घ्यावयाची काळजीपासून ते मान्सून मधील पूरपरिस्थिती याविषयी जिल्ह्यातील ’आपदा मित्र’ आणि ’आपदा सखी’ यांना आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करून आराखडे तयार करून होणारी जिवितहानी व वित्तहानी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. (Jalgaon Collector Prasad statement Plan regarding heat stroke flood situation)
सरदार वल्लभ भाई पटेल लेवा भवनात झालेल्या एक दिवसीय कार्यशाळेचे ते बोलत होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारा जळगाव जिल्हयातील प्रशिक्षित आपदा मित्र,आपदा सखी यांनी येणाऱ्या उन्हाळ्यात उष्माघात विषयी घ्यावयाची काळजी ,आपत्ती येणाऱ्या भागात नदी.
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या मान्सून काळात येणाऱ्या आपत्ती समस्या कशा टाळता येईल असा अभ्यास करून सदर विभागास कळविणे ही जबाबदारी असल्याचे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन यांनी सांगितले. रेडक्रॉसचे चेअरमन विनोद बियाणी म्हणाले, की जेव्हा आपत्ती काळात मदत करतो तो देवदूता प्रमाणे असतो. (latest marathi news)
आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर सिंह रावळ यांनी आपदा मित्र यांनी आपल्या परिसरातील आपत्ती कमी कशी होईल याचा अभ्यास करावा. रेडक्रॉसचे अध्यक्षांनी प्रत्येक आपदा मित्रांना ऑक्सिमिटरचे वितरण केले. सर्प जनजागृतीचे राजेश सोनवणे जगदीश बैरागी यांनी सर्प विषयी माहिती व वन्यजीव संस्था सचिव योगेश गालफाडे यांनी सूत्रसंचालन केले.
होमगार्ड ,एनएसएस, रेडक्रॉस यांचे जिल्ह्यातील सर्व आपदा मित्रांना मार्गदर्शन करून मंत्रायलाचे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार ऋषि गढवाल यांनी मार्गदर्शन केले. अर्जुना संस्था ,वन्यजीव संरक्षण संस्थेने सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.