Jalgaon News : पारोळ्यातील 20 सदस्यांचे एकत्रित क्षत्रिय कुटुंब; आदर्श क्षत्रीय कुटुंबाचे पंचक्रोशीत सगळ्यांनाच अप्रूप

Jalgaon : मनाला भुरळ घालणारे आधुनिक युगात विभक्त कुटुंबाचा नवा ट्रेंड सर्वत्र पाहावयास मिळतो.
Combined family of Mrs. Kusumbai Laxmansa Kshatriya
Combined family of Mrs. Kusumbai Laxmansa Kshatriyaesakal
Updated on

Jalgaon News : मनाला भुरळ घालणारे आधुनिक युगात विभक्त कुटुंबाचा नवा ट्रेंड सर्वत्र पाहावयास मिळतो. लहान कुटुंबे सुखी कुटुंब अशी लालसी वृत्तीतून स्वतंत्र राहण्याच्या वृत्तीत आजी, आजोबा, काका, काकू, चुलत भावंडे असा एकत्रित कौटुंबिक गोतावळा पाहायला मिळत नाही. मात्र अशा परिस्थितीत येथील वीस सदस्यांचे क्षत्रिय कुटुंब हे पारोळाच नव्हे तर पंचक्रोशीत समाजासाठी आदर्श रोल मॉडेल कौतुकाचा विषय ठरत आहे. ( Combined Kshatriya family of 20 members from Parola )

आजच्या धकाधकीच्या जीवनात मोठे कुटुंब अधिक सुखी आणि समाधानाने राहू शकते याचे जिवंत उदाहरण क्षत्रिय परिवाराचे देता येईल व अभिमानाने सांगता येईल. दिवंगत लक्ष्मणसा श्रीधरसा क्षत्रिय व श्रीमती कुसुमबाई लक्ष्मणसा क्षत्रिय यांना चार मुले, तीन मुली असा परिवार आहे . जनसामान्यांची सेवा व्हावी मुलांनी शिक्षणातून नोकरीकडे न वळता स्वतः यशस्वी उद्योजक म्हणून समाजात भरारी घ्यावी या भावनेतून दिवंगत लक्ष्मणसा क्षत्रिय यांनी कापड व्यवसायातून सुरवात केली.

मोठा मुलगा केशव, , अमृत व धर्मेंद्र क्षत्रिय अशा तीन बंधू शिवाय कोरोना काळात मोहन क्षत्रिय यांचे निधन झाले. आई -वडिलांचे चरणस्पर्श करून प्रातःकाळी दिवसाचा शुभारंभ करणाऱ्या क्षत्रिय परिवारातील भावंडे यांच्या समविचारामुळे एकत्रित कुटुंब राहिल्याने आज अमृत ग्रुप म्हणून त्यांची ओळख दोन जिल्ह्यात उंचावली आहे.

पर्यायाने कापड व्यवसायातून शहरात दोन तर धुळे व शिरपूर येथे येथे अमृत कलेक्शनच्या शाखा कार्यरत असल्याने हजारो ग्राहकांना ते सेवा देत असल्याने ग्राहकही त्यांच्या कार्याबाबत नेहमी समाधान व्यक्त करत असताना दिसत असल्याने शहरात क्षत्रिय परिवाराचा लौकिक आहे.सर्वच भावंडे अमृत कलेक्शनच्या छताखाली रेडीमेड ,शूटिंग, शर्टिंग साडी व ड्रेस मटेरिअल अशा अनेक विभागात कार्यरत असल्याने आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. (latest marathi news)

Combined family of Mrs. Kusumbai Laxmansa Kshatriya
Jalgaon News : दहावीच्या मुलाने मामाच्या घरी गळफास घेत संपवलं जीवन

प्रगती मैत्रीचा घट्ट हात

आज-काल नवीन पिढीला एकत्र कुटुंब पद्धतीचा ट्रेड नकोसा वाटतो मात्र एकत्रित पणाला ममतेचा आधार असतो. आजी ,आजोबा यांच्या हातचे जेवण त्यांच्या बालपणातील गोष्टी किंवा खडतर प्रवासातून यशाचा मार्गाने नक्कीच प्रेरणा मिळते . एकत्र कुटुंबात दुःख वाटले जाते. पर्यायाने सुखी राहण्याचा मूलमंत्र ही मिळतो. सामाजिक प्रतिष्ठा व आर्थिक प्रगतीचा मार्ग नेहमीच जीवनाला सुख देत असल्याचा या कुटुंबाचा अनुभव आहे.

क्षत्रिय परिवाराचा सिंहाचा वाटा

शहरासह अनेक समाजाभिमुख पर्यावरणीय उपक्रमात क्षत्रिय परिवाराचे योगदान असते. शहरात विविध सामाजिक संस्था तसेच शासकीय व खासगी स्तरावरील कार्यात परिवाराचे योगदान वाखाणण्याजोगी आहे. (कै) लक्ष्मणसा क्षत्रिय यांच्याकडून मिळालेले समाजसेवेचे बाळकडू घेतलेले केशव क्षत्रिय व त्यांच्या भावंडातील प्रगतीची एकजूट कौतुकास्पद आहे.

क्षत्रिय परिवाराची तिसरी पिढीचे शैक्षणिक व सामाजिक कार्यात योगदान अधोरेखित करण्यासारखे आहे. तिसरी पिढी उच्च शिक्षणाबरोबर आजोबांच्या कापड व्यवसायाला हातभार लावत आहे. महिला सदस्यांची देखील या व्यवसायाला जोड मिळत असल्यामुळे हा परिवार तालुक्यात एकजुटीचे व समाजासाठी आदर्श कुटुंब ठरले आहे.

Combined family of Mrs. Kusumbai Laxmansa Kshatriya
Jalgaon News : 'बँड' ने बदलला 'लुक'! कालौघात नावातून 'ब्रास' शब्दही 'बाद'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.