Jalgaon News : पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांची स्पर्धा; वादळातील नुकसानग्रस्त वर्गखोल्यांची दुरुस्ती

Jalgaon : तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुरेपूर प्रयत्न केले आहेत.
Staff cleaning feeding containers under teacher supervision.
Staff cleaning feeding containers under teacher supervision.esakal
Updated on

Jalgaon News : तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. त्यासाठी शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले. वादळी वारा व पावसामुळे तालुक्यातील तीन शाळांचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शाळांसह इतरही शाळांची दुरुस्ती व डागडुजी शिक्षक, ग्रामस्थ व ग्रामशिक्षण अभियान समितीच्या प्रयत्नाने झाली आहे. घोडसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची घोड्यावरून प्रभातफेरी काढण्यात आली. ( Teacher competition to increase marks )

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत झाले. त्यासाठी मुख्याध्यापक अनिल पवार, शिक्षक भिका जावरे, सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दुतोंडे, स्वाती फिरके यांनी परिश्रम घेतले. पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे मराठी माध्यमासाठी पहिलीची ४७३ पुस्तके, दुसरीसाठी ६८२, तिसरीची ९४० पुस्तके, चौथीची १६०५, सेमी माध्यमाच्या पहिलीची ६४५ पुस्तके, दुसरीची साडेसहाशे पुस्तके, तिसरीची ८०० पुस्तके, चौथीची पाचशे, पाचवीची ६०८, सहावीची नऊशे, सातवीची नऊशे, आठवीची १०७० पुस्तके, उर्दू माध्यमाच्या पहिलीची २५६, दुसरीची २५३, तिसरीची २५६, चौथीची २८८, पाचवीची २८८, सहावीची २७०, सातवीची २२७, आठवीची १८७ पुस्तकांचे वाटप झाले. (latest marathi news)

Staff cleaning feeding containers under teacher supervision.
Jalgaon News : तापी-पूर्णा संगमावरील घाट बनला धोकादायक; भाविकांसह पर्यटकांची गैरसोय

तालुक्यात शिक्षकांची ५४ पदे रिक्त

तालुक्यातील शालेय पोषण आहार अधीक्षकपद रिक्त आहे. केंद्रप्रमुखांची दहापैकी आठ पदे रिक्त आहेत. मराठी माध्यमात ३५३ पदे मंजूर असून, ३४ पदे रिक्त आहेत. उर्दू माध्यमात ७३ पदे मंजूर असून, २० पद रिक्त आहेत.

''जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिक्षकांनी मेहनत घेतली.''-मदन मोरे, गटशिक्षणाधिकारी, मुक्ताईनगर

''शाळा प्रवेशोत्सवानिमित्त शालेय परिसर, शालेय पोषण आहार साधने व परस बागेची साफसफाई करून घेतली. मागील वर्षी शाळेला ‘मुख्यमंत्री सुंदर शाळा व स्वच्छ शाळा’ पुरस्कार मिळाला असून, या वर्षी शाळा राज्यस्तरापर्यंत नेण्याचे नियोजन केले आहे.''-भिका जावरे, उपशिक्षक, जि. प. शाळा, रुईखेडा

Staff cleaning feeding containers under teacher supervision.
Jalgaon News : कांगावा करणाऱ्या शिंदेंनी नैतिकता शिकवू नये : आमदार किशोर पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.