Erandole MSRTC Depot : एरंडोल बसस्थानकावरील अस्वच्छतेमुळे प्रवासी त्रस्त; तक्रारींकडे दुर्लक्ष

MSRTC Depot : बंद असलेले हिरकणी कक्ष, स्थानकातील तुटलेल्या फरशा, पाण्याच्या टाकीजवळील घाण यांसारख्या समस्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत.
The disrepair of the bus stand.
The disrepair of the bus stand.esakal
Updated on

एरंडोल : येथील नवीन बसस्थानकावरील अस्वच्छता, स्वच्छतागृहांची झालेली दुरावस्था, बसस्थानक परिसरातच तुंबत असलेले स्वच्छतागृहांचे सांडपाणी, बंद असलेले हिरकणी कक्ष, स्थानकातील तुटलेल्या फरशा, पाण्याच्या टाकीजवळील घाण यांसारख्या समस्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. शिवाय प्रवाशांनी याबाबत केलेल्या लेखी तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे परिवहन महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Complaints of commuters suffering due to unsanitary conditions at Erandol bus stand are ignored )

राष्ट्रीय महामार्गालगत सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी नवीन बसस्थानक व आगाराचे बांधकाम करण्यात आले होते. बसआगार सुरू झाल्याने लांबपल्ल्याच्या बसगाड्या सुरू झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच मोठा खड्डा पडल्याने अपघात होण्याची भीती आहे. बसस्थानकावरील दोन्ही उपहारगृह, फळ दुकान, बुकस्टॉल, जनरल स्टोअर्स बंद आहेत.

बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच खाद्य पदार्थ विक्रेते व फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसस्थानकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, सर्वत्र अस्वच्छता राहत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. प्रवाशांसाठी असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ सर्वत्र घाण जमा झाली आहे. महिलांसाठी असलेले हिरकणी कक्षाला कुलूप लावल्याने महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.

बसस्थानकावरील स्वच्छतागृहाचे सांडपाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने सर्व सांडपाणी परिसरातच तुंबते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. स्वच्छतागृहाचे फलक तुटले आहेत. स्थानकातील फारशा तुटल्या आहेत. आवाराचे डांबरीकरण नसल्याने बस आल्यानंतर सर्वत्र धूळ उडते. त्यामुळे वयोवृद्ध प्रवासी व लहान बालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात सर्वत्र चिखल होत असल्याने प्रवाशांना बसमध्ये चढताना व उतरताना तारेवरची कसरत करावी लागते. सायंकाळी साडेसातनंतर धुळ्याकडून येणाऱ्या बस स्थानकावर न आणता प्रवाशांना रस्त्यावरच उतरवले जाते. अनेकदा स्थानकापासून अर्धाकिलोमीटर दूर असलेल्या धरणगाव चौफुली येथे अथवा दोन किलोमीटर दूर पिंप्री फाट्याजवळ उतरवले जाते. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. (latest marathi news)

The disrepair of the bus stand.
Pachora MSRTC Depot : खिळखिळ्या बसगाड्यांमधून जीवघेणी कसरत! अनेक वर्षांपासून जुन्याच गाड्या वापरात

सुमारे चार महिन्यांपूर्वी रात्री आठच्या सुमारास बसचालकाने बस स्थानकात न आणता एका महिलेस तिच्या तीन वर्षांच्या मुलासह अंधारात उड्डाणपूलाच्या पुढे उतरवले होते, याबाबत लेखी तक्रार दिल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. रात्री आम्ही बस स्थानकावर बस नेत नाही, उड्डाणपुलाजवळ उतरा व नातेवाईकांना घेण्यासाठी बोलावून घ्या, असा अजब सल्ला बसचालकाने महिलेस दिला होता.

प्रवाशांनी केलेल्या लेखी तक्रारींकडे देखील दुर्लक्ष करण्यात येत असल्याने परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रवासी वर्गातून प्रश्न उपस्थित केला जात आहे. आगारातील अनेक बसची दयनीय अवस्था झाली आहे. ऐनवेळी ग्रामीण भागातील अनेक बस रद्द केल्या जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते. बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला तरी निविदा ओपन न झाल्याने कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

''ग्रामीण भागातील बसफेऱ्या अचानक रद्द केल्या जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. शिवाय बसस्थानकावर प्रवाशांसाठी पुरेशा प्रमाणावर सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.''- रोहिदास पाटील, अध्यक्ष, संजीवन व्यसनमुक्ती केंद्र, एरंडोल.

''बसस्थानकावरील हिरकणी कक्षात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध आहते. त्यांचा दुरुपयोग होऊ नये म्हणून कुलूप लाऊन त्याची किल्ली वाहतूक नियंत्रकांकडे असते. महिलांनी मागणी केल्यानंतर त्वरित हिरकणी कक्ष उघडण्यात येते. बसस्थानकावरील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. बसस्थानकाची नियमित स्वच्छता करण्याची सुचना संबंधितांना देण्यात येईल.''- नीलिमा बागुल, आगारप्रमुख, एरंडोल.

The disrepair of the bus stand.
Jamner MSRTC Depot : जामनेर बसस्थानकाला अतिक्रमणांंचा विळखा, अपघाताचा धोका; पिण्याच्या पाण्याची असुविधा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.