Jalgaon News : जळगाव जिल्ह्याचा 2047 पर्यंत होणार सर्वंकष विकास; कृषी, सेवा, उद्योगावर भर

Jalgaon : भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत २०४७’ करण्याचा संकल्प केला आहे.
While presenting the development plan of the district to Collector Ayush Prasad, Dr. Anil Dongre
While presenting the development plan of the district to Collector Ayush Prasad, Dr. Anil Dongreesakal
Updated on

Jalgaon News : भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत २०४७’ करण्याचा संकल्प केला आहे. या दृष्टीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर, २०३७ पर्यंत २.५ ट्रिलियन डॉलर व २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलर करण्याचे आहे. यासाठी विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. (Jalgaon Comprehensive development of district till 2047)

या दृष्टीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाबरोबर जिल्हा प्रशासनाने विकास आराखडा करण्यासाठी करार केला होता. तो विकास आराखडा मंगळवारी (ता.१२) जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादर केला. विद्यापीठाचे डॉ. अनिल डोंगरे, डॉ. राजेश जवळेकर, डॉ. उज्ज्वल पाटील, डॉ. आर. आर. चव्हाण, प्रा. मनोज पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, सल्लागार शशी मराठे उपस्थित होते.

अत्यंत सूक्ष्म अभ्यास

विद्यापीठासोबत ऑक्टोबरमध्ये सामंजस्य करार करण्यात आला होता. आराखडा तयार करत असताना विविध विभागातील शासकीय, निमशासकीय व खासगी भागधारकांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन चर्चा केली. त्या चर्चेत विकासासाठी आवश्यक कृषी व कृषी संलग्न उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचा आराखडा तयार करण्यात आला.

या विकास आराखड्यात जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी विविध उपाय योजना सुचविण्यात आल्या आहेत. यात डिस्ट्रिक्ट एक्स्पोर्ट डॉक्युमेंटेशन सेल, जळगाव अलाईड इंडस्ट्री प्रमोशन सेल, या सारख्या उपाययोजना सुचविल्या आहेत. या उपाययोजनांमुळे जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊन विकासाकडे वाटचाल होईल. विकास आराखडा बनवताना विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांचे मार्गदर्शन लाभल्याचे तज्ञ प्राध्यापकांनी यावेळी सांगितले. (latest marathi news)

While presenting the development plan of the district to Collector Ayush Prasad, Dr. Anil Dongre
Jalgaon Loksabha : खासदारांची उमेदवारी कापण्याचा इतिहास घडणार की वर्तमान राहणार! जिल्ह्यात उत्सुकता

या गोष्टींवर द्यावा लागेल भर?

* पायाभूत सुविधांचा विकास करणे

* निर्यात वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक सोई सुविधा तयार करणे

* वेळोवेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजार संशोधन, विश्लेषण करणे

सरकारी संस्थांचे मिळणार सहकार्य

* वाहतूकदारांसाठी आंतर जिल्हा नेटवर्क सुविधा केंद्राची निर्मिती

* जळगाव संलग्न उद्योगांना प्रोत्साहन क्षेत्र निर्माण करणे

* अन्न प्रक्रिया, जतन कक्ष (Storage) निर्माण करणे

** प्रभावी पाणी व्यवस्थापन मृद व जलसंधारणासाठी पिकांचे फेरपालट / विविधीकरण

* कृषी संबंधित सूक्ष्म व लघु उद्योगांना चालना देणे बाबत उपाययोजना

* शेतीच्या यांत्रिकीकरणावर भर

* माती, पाणी आणि अन्न चाचणी सुविधा निर्माण करणे

* पशुसंवर्धनात गुणवत्ता पूर्ण वाढ

* शेती व्यवसाय शाश्वत करण्यासाठी प्रयत्न

** जळगाव जिल्हा निर्यात वृद्धी

While presenting the development plan of the district to Collector Ayush Prasad, Dr. Anil Dongre
Jalgaon News : टोल सुरू होण्यापूर्वीच नाक्याची जाळपोळ; पोलिसात गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.