Jalgaon News : लग्नाला आठ-दहा वर्षे झाली, मुलबाळही झाले सर्वकाही व्यवस्थीत असतांना कुठे संशयाचे भुत डोक्यात शिरते तर, कुठे टिव्ही सिरीयल्सप्रमाणे कटकारस्थाने रचुन कुटूंबच वेठीस धरले जाते. कोठे दागिने, कार खरेदीचा हव्यास तर कोठे मोबाईलवर सातत्याने बोलण्यावरुन वाद उद्भवतात. अशा छोट्या-मोठ्या विविध कारणांवरुन गैरसमज आणि भांडणांचे प्रमाण वाढत गेल्याने सुखी संसारात काडीमोड होण्याचीही वेळ येते. (Compromise in 173 cases in women vigilance department received 1090 applications in 5 months )
अशा नानाविध तक्रारींवर आधारीत अवघ्या पाच महिन्यात महिला दक्षता विभागात १ हजार ९० अर्ज प्राप्त झाले. त्यातील केवळ १७३ प्रकरणात यशस्वी तडजोड घडवून आणण्यात यश आले तर उर्वरित प्रकरणांचा निपटारा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी आणि हुंडाबळी रोखण्यासाठी कलम-४९८ अंमलात आणला गेला. कौटूंबिक हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी या अधिनियमाचा सुरवातीला बराच फायदाही झाला.
मात्र, या कलमाचा अकारण अडवणुक करण्यासाठी वापर वाढल्याचे निदर्शनास आले. परिणामी कौटूंबिक कलह, वाद विवाद आपसात सोडवण्यासाठी पोलिस दलात स्वतंत्र कक्षच स्थापन झाले. तर, कौटूंबीक वादात समेट घडवून आणण्यासाठी कौटूंबिक न्यायालये अस्तित्वात आली. दोन्हीकडे कुठलाही संसार कसा वाचवता येईल हाच एकमेव उद्देश समोर ठेवुन प्रयत्न सुरु आहेत.
जिल्हा पेालिस दलाच्या महिला दक्षता विभागात जिल्हा भरातून तक्रारींचा ओघ सुरु असतो. प्रत्येक महिन्याला तीनशे तर दिवसाला किमान आठ-दहा अर्ज नवे प्राप्त होतात. प्रत्येक अर्जात लग्नाच्या पहिल्या वर्षापासून ते चक्क १०-१५ वर्षे लग्नाला होवूनही पती-पत्नीच्या भांडणची प्रकरणे असतात. गेल्या पाच महिन्यात १ हजार ९० अर्ज प्राप्त झालेत. या तक्रारीत जळगाव शहरासह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशासह वेगवेगळ्या राज्यातील पतीविरुद्ध तक्रारींचा समावेश आहे.(latest marathi news)
२६९ गुन्हे दाखल
जानेवारी ते मे २०२४ अखेर कौटुंबिक कलहाच्या प्रकरणात १ हजार ६७ तक्रारी अर्ज प्राप्त झाले. त्यात २६९ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहचले असून कोणाची फारकत, कुटुंबात समजोता झाला आहे.
तीन जणींची आत्महत्या
सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आणि वेळीच समझोता न झाल्याने तीन विवाहितांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्यात जुलेखा गफ्फार पटेल (२८, रा. भादली, ता. जळगाव) २ मार्च रेाजी गळफास घेतला. २५ एप्रिल रोजी ममता रतीलाल राठोड (३४, रा. मन्यारखेडा) या विवाहितेने आत्महत्या केली. तर, रुपाली मनोहर माळी (३२, रा. द्वारकानगर, जुना खेडी रोड) या विवाहितेने सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.
२०२३ मध्ये ५८५ गुन्हे
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या दरम्यान वादासह कौटुंबिक हिंसाचाराचे एकूण २०८० अर्ज दाखल झाले. त्यात ५८५ गुन्हे दाखल झाले आहेत. तर ३६९ प्रकरणांमध्ये समजोता घडवून आणला. काही अर्ज न्यायालयात पोहचली, काहींमध्ये घरीच तडजोड झाली. गेल्या वर्षीचा एकही प्रलंबित नसून प्रकरणे निकाली काढण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.