Jalgaon News : दहिगाव रस्त्याचे कॉंक्रिटीकरण; सामनेरसह लोकलखेडे, बोरनारच्या शेतकऱ्यांमधून समाधान

Jalgaon News : दहिगावकडे जाणाऱ्या गावांतर्गत ३५० मीटर रस्त्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून नुकतेच कॉंक्रिटीकरण करण्यात आले.
The deplorable condition of the road leading to Dahigaon before concreting and the second photo shows the road after concreting.
The deplorable condition of the road leading to Dahigaon before concreting and the second photo shows the road after concreting.esakal
Updated on

सामनेर (ता. पाचोरा) : येथून दहिगावकडे जाणाऱ्या गावांतर्गत ३५० मीटर रस्त्याचे आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून नुकतेच कॉंक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे सामनेरसह दहिगाव, लोकलखेडे, बोरनार शिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. सामनेर येथून ३५० मीटरचा हा रस्ता नागरी वस्तीतून जातो. या रस्त्याच्या काही भाग खोलगट असल्याने गटारीचे व पावसाळ्यातील पाणी या रस्त्यावर साचत होते. (Concreting of Dahigaon road Satisfaction from farmers of Bornar )

ज्यामुळे या रस्त्यावरुन पायी चालणे देखील अवघड होत होते. रस्त्याच्या या समस्येबाबत येथील ग्रामपंचायतीने आमदार किशोर पाटील यांच्यासह पाचोरा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक पाटील व शाखा अभियंता श्रीनिवास काजवे यांच्याकडे कॉंक्रिकरण करण्याची मागणी केली होती. या संदर्भात दै. ‘सकाळ’ने देखील वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत, आमदार किशोर पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २५३ जळगाव ते चांदवडवरील सामनेर गावाकडे एक किलोमीटर डांबरीकरण व गावातील नागरी वस्तीकडून दहिगावकडे जाणाऱ्या ३५० मीटरच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम मंजूर करुन दिले.

हे काम नुकतेच पूर्णत्वास आले असून बाजूच्या जोड रस्त्यांना पाईप व मोरी टाकलेल्या आहेत. महामार्गापासून गावात येणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पावसाळा संपल्यानंतर केले जाईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. कॉंक्रिट रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रिटच्या गटारी करण्याचे आश्‍वासन आमदार पाटील यांनी दिले आहे.

The deplorable condition of the road leading to Dahigaon before concreting and the second photo shows the road after concreting.
Jalgaon News : लग्नाचे आमिष दाखवून जळगावात महिलेवर अत्याचार; पीडित गर्भवती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.