Jalgaon Constituency Lok Sabha Election Result : जळगावात भाजपने गड राखला! स्मिता वाघ यांनी उधळला विजयाचा गुलाल

Jalgaon Lok Sabha Election Result 2024 BJP smita wagh wins over Shivsena UBT Karan Pawar : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगाव लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं, येथे भाजपच्या स्मिता वाघ यांनी विजय मिळवला आहे.
Jalgaon Lok Sabha Election Result 2024
Jalgaon Lok Sabha Election Result 2024
Updated on

Jalgaon Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगाव लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून एनडीएच्या स्मिता वाघ यांचा निवडणुकीत विजय झाला आहे.

येथे महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान मागील २० वर्षांपासून जळगावात भाजपचा खासदार आहे, त्यामुळे यंदा येथे काही चमत्कार होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. जळगाव लोकसभा मतदारसंघात यंदा ५८.४७ टक्के मतदानांची नोंद झाली होती.

जळगाव मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास यामध्ये जळगाव शहरासह ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव व पाचोरा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यातील जळगाव, चाळीसगावात भाजपचे, तर जळगाव ग्रामीण, एरंडोल व पाचोरा येथे शिवसेना (शिंदे गट) आमदार आहेत. अमळनेरला राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार आहेत. जळगाव (ग्रामिण) येथे गुलाबराव पाटील, पाचोऱ्यात किशोर पाटील व एरंडोलमध्ये चिमणराव पाटील हे शिवसेनेचे आमदार असल्याने येथे शिंदे गटाची भूमिका महत्त्वाची मानली जात होती.

Jalgaon Lok Sabha Election Result 2024
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेचं मैदान अन्‌ राजकारणातील दिल, दोस्ती, दुनियादारी

२०१९ च्या निवडणुकीचा निकाल

२०१९ मध्ये भाजपकडून निवडणूक लढलेले उन्मेष पाटील ७१३८७४ मते घेऊन विजयी झाले होते. पण २०२४ मध्ये ते भाजपचा हात सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर ३०२२५७ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले होते. तर अंजली बाविस्कर (वंचित आघाडी) ३७३६६ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होत्या. जळगाव मतदारसंघात २००४ पासून भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे यावेळी भाजप त्यांचा बालेकिल्ला राखण्यात यशस्वी होते की नाही याची उत्सुकता पाहायला मिळत होती.

Jalgaon Lok Sabha Election Result 2024
Jalgaon Lok Sabha Constituency : आगामी राजकीय वाटचालीसाठी ‘है तय्यार हम..’दिग्गजांच्या वारसदारांचा लोकसभा निवडणुकीत प्रभावी सहभाग

प्रभावी मुद्दे काय?

भाजपने खासदार उन्मेष पाटील यांची उमेदवारी कापली आणि माजी आमदार स्मिता वाघ यांनी भाजपची उमेदवारी जाहीर केली. यानंतर मतदारसंघातील वातावरण तापायला सुरू झाले. मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रलंबित पाडळसरे प्रकल्प, रखडलेला औद्योगिक विकास, कापूस उत्पादक शेतकरी जास्त असल्याने कापसाच्या दराचा मुद्दा, गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांचा प्रस्तावित प्रकल्प या मुद्द्यांवर देखील मतदारसंघातील प्रचार पार पडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.