Aids
AidsSakal

एड्स नियंत्रण कार्यक्रमांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी - जिल्हाधिकारी राऊत

जळगावमध्ये एड्स जनजागृतीपर पोस्टर्सचे प्रदर्शन
Published on

जळगाव : एड्स नियंत्रण कार्यक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे एचआयव्ही/एड्स आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे. १९८८ पासून आजपावेतो जिल्ह्याची एचआयव्ही/एड्स नियंत्रण कार्यक्रमाची सांख्याकी माहिती पाहिली असता जळगाव जिल्ह्यात एड्स नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

आरोग्य विभाग व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त जागतिक एड्स दिन सप्ताहाचे उद्‌घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. जी. चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी प्रास्ताविकात एड्‌स नियंत्रणाबाबत केलेल्या कामाची माहिती दिली.

Aids
MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संघर्ष लवकरच दिसणार पडद्यावर

एड्‌स नियंत्रण विभागातर्फे यंदा ‘असमानता संपवा, एड्स संपवा, महामारी संपवा’ हे घोष वाक्‍य असून प्रत्येक व्यक्‍तीने एड्स विषयक जास्तीत जास्त माहिती मिळविणे, एचआयव्ही प्रतिबंधात्मक उपायांचे अनुकरण करणे, एचआयव्ही तपासणी करुन घेणे, त्यासंबधी औषधोपचार मिळविणे हा त्याच्या आरोग्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समितीने हा कार्यक्रम घेतला.

दिशा बहुउद्देशीय संस्थेचे विनोद ढगे यांनी एड्स जनजागृतीपूर्वक पथनाट्य सादर केले. जनजागृतीसाठी पोस्टर प्रदर्शन जिल्हा रुग्णालयात जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागासमोर पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले. महाविद्यालयीन युवक युवतींनी सहभाग नोंदविला. सेल्फी पॉइंटद्वारे फोटो काढले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. मारुती पोटे, डॉ. भाऊराव नाखले, डॉ. इम्रान खान यांनी सेल्फी पॉइंटवर आपले स्वतःचे फोटो काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.