Jalgaon Lok Sabha Election : गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी समन्वय राखा; चोपड्यात आंतरराज्य सीमा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

Jalgaon Lok Sabha Election : निवडणूक कालावधीत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी समन्वया राखण्याच्या सूचना महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election esakal
Updated on

Jalgaon Lok Sabha Election : चोपडा तालुका हा मध्य प्रदेश सीमेवर असून, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.२७) मध्य प्रदेशातील बडवाणी येथील पोलिस दल आणि महाराष्ट्र पोलिस यांचा संयुक्तिक पाहणी दौरा झाला असून, निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हा आजचा आंतरराज्य पाहणी दौरा असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Jalgaon coordinate to prevent malpractice Instructions to officials)

या दौऱ्यात जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, बडवानी (मध्य प्रदेश) येथील जिल्हा पोलिस अधीक्षक पुनीत गहलोत यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा झाला. निवडणूक कालावधीत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी समन्वया राखण्याच्या सूचना महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित या दौऱ्यात चोपडा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेवरील वैजापूर.

उमर्टी, पार उमर्टी, सत्रासेन या गावातील सीमांची पाहणी करून पोलिसांनी विचारांची देवाणघेवाण करीत नाकाबंदी संदर्भात चर्चा केली. तसेच दोनही जिल्ह्यातील हिटलिस्टवरील आरोपींची शहानिशा करून भविष्यात त्यांचाही बंदोबस्त करण्याकामी या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला. तालुक्यातील उमर्टी येथून मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे सर्वत्र विकले जात असल्याने या गंभीर प्रकाराची दखल यावेळी घेण्यात आली.

दोघेही राज्यातील पोलिसांनी आगामी काळात आपापसात सहकार्याची भूमिका घेत गैरकृत्यांना आळा कसा घालता येईल, याबाबतही दोघं राज्यातील पोलिस अधिकाऱ्यात चर्चा करण्यात आली. प्रारंभी येथील नगरपरिषद सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात येऊन तदनंतर सीमा भागातील गावांना भेटी देण्यात आल्या. (latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon News : जळगाव माध्यमिक शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

या वेळी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे ग्रामीण पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सावळे, मध्य प्रदेशातील बडवानी जिल्हा पोलिस अधीक्षक पुनीत गहलोत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल पाटीदार, पोलिस उपअधीक्षक कमलसिंग चौहान, पोलिस निरीक्षक माधवसिंग ठाकूर आदी पोलिस अधिकारी मंडळी यावेळी हजर होते.

बेकायदेशीर वाहतुकीवर नजर

या वेळी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील आंतरराज्य सिमेवरील तपासणी नाके व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोख रक्कम, मद्य अंमली पदार्थ, वस्तू आदीचे बेकायदेशीर वाहतूक नियंत्रण व पर्यवेक्षणाच्या अनुषंगाने नियोजन सादर केले.

सर्व उपस्थितांना आंतरराज्य सिमेवरील निवडणूक काळातील विविध वस्तू, मद्य, अंमली पदार्थ, रोख रक्कम आदींची वाहतूक यावरील नियंत्रण व निवडणूक कालावधीत गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी समन्वया राखण्याच्या सूचना महाराष्ट्र व मध्यप्रदेशमधील उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon News : जिल्ह्यात ज्वारीची आवक वाढली!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.