Jalgaon Crime News : तांब्याचे पाइप घेणारा भंगार विक्रेता अटकेत; अजिंठा हाफकीन कंपनी चोरी प्रकरण

Jalgaon Crime : अजिंठा हाफकीन कंपनीतून तांब्याचे पाइप चोरी प्रकरणी भंगार विक्रेत्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.
Dnyaneshwar Sonawane Rafiq Shah
Dnyaneshwar Sonawane Rafiq Shahesakal
Updated on

Jalgaon Crime News : अजिंठा हाफकीन कंपनीतून तांब्याचे पाइप चोरी प्रकरणी भंगार विक्रेत्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेली अजिंठा हाफकीन फार्मास्युटिकल्स कंपनी काही दिवसांपासून बंद आहे. कंपनीतून ६३ हजार रुपयांची १७ किलो तांब्याचे पाइप चोरून नेले होते. (JCopper pipe scrap dealer arrested )

सहायक व्यवस्थापक तुषार चौधरी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर सोनार याने ही चोरी केल्याची माहिती गुन्हेशोध पथकाला मिळाली. त्यावरून निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, कर्मचारी सचिन मुंढे, रामकृष्ण पाटील, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, साईनाथ मुंढे, ललित नारखेडे, किरण पाटील.

Dnyaneshwar Sonawane Rafiq Shah
Jalgaon Crime News : भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपींसह अन्य गुन्हेगारांवर ‘मोक्का’

छगन तायडे यांनी ज्ञानेश्वर सोनार (२५, रा. मेहरुण) व विनोद गोपाळ मोरे (वय २२) यांना अटक केली. चौकशीत त्यांनी चोरीचा माल कस्तुरी हॉटेलमागील रामनगरातील भंगार व्यवसायिक शेख सईद रफीक शहा (वय ५३, रा. रजाकॉलनी, मास्टर कॉलनी) यास विकल्याची कबुली दिली. त्यावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी (ता. २४) न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश मोरे यांनी संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

Dnyaneshwar Sonawane Rafiq Shah
Jalgaon Crime News : ट्रॅक्टर न दिल्यावरून तरवाडेत बापलेकास मारहाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.