Jalgaon News: अमळनेर तालुक्यात कपाशीचे क्षेत्र घटणार! उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल; बागायतदारांकडून मृग नक्षत्राच्या आधीच पेरणी

Jalgaon News : ६८ हजार १४२ हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. तालुक्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल दिसून येत आहे.
Crowd of farmers to buy seeds. In the second photo, a woman is planting cotton in Mandal.
Crowd of farmers to buy seeds. In the second photo, a woman is planting cotton in Mandal.esakal
Updated on

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : तालुक्यात खरिपाच्या कामे सुरू आहेत. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रापूर्वीच काही हेक्टरवर पेरणी केली आहे. ६८ हजार १४२ हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे उद्दिष्ट आहे. तालुक्याची उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल दिसून येत आहे. (Jalgaon Cotton area will decrease in Amalner taluka)

मागील वर्षी ६८ हजार क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. मात्र, पावसाचा खंडामुळे खरीप पिकांची उत्पादकता मागील वर्षी कमी होती. तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. खरिपासाठी दोन लाख ५८ हजार १२५ कपाशी बियाणांची पाकिटे प्राप्त झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या बीटी ६५९ वाणाची कृत्रिम टंचाई काही प्रमाणात निर्माण केली जात आहे, म्हणून कृषी विभागाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेमार्फत सोसायट्यांकडून पीककर्ज वाटप केले जात आहे. तालुक्यातील ९१पैकी १३ सोसायट्या अनिष्ट तफावतीत होत्या. मेअखेर रेग्युलर सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना ८२ कोटी व अनिष्ट ताफवतीच्या १३ सोसायटीच्या शेतकऱ्यांना तीन कोटी आठ लाखांचे कर्जाचे वाटप करण्यात आले. (latest marathi news)

Crowd of farmers to buy seeds. In the second photo, a woman is planting cotton in Mandal.
Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! विधानसभेला 'एकला चलो रे'चा नारा; २५० उमेदवार उभे करण्याची तयारी?

पशुसंवर्धन विभागातर्फे लसीकरण

पशुसंवर्धन विभागातर्फे पावसाळ्यापूर्वी १५ हजारांपेक्षा जास्त गुरांचे लसीकरण झाले आहे. तालुक्यात एकूण २९,८०० लिम्पि लस प्राप्त झाल्या. त्यापैकी २१,३०० जनावरांना लसीकरण करण्यात आले. दहा हजार ६२० फऱ्या घटसर्फ लस प्राप्त झाल्या. त्यापैकी तीन हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले.

सात हजार अंत्रविषार लस प्राप्त झाल्या. त्यापैकी १,५०० जनावरांना लसीकरण करण्यात आले. या वर्षी पाऊस चांगला होणार असल्याचे आयएमडीतर्फे संकेत मिळाले आहेत. कपाशी पिकाचे क्षेत्र तालुक्यात जास्त आहे. त्यामुळे आंतरपीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी दिली.

"मागील दोन ते तीन वर्षांपासूम कपाशीच्या भावात झालेली घसरण, बोगस बियाणे, बियाण्यांची कृत्रिम टंचाई या कारणांमुळे कापूस पिकाऐवजी मका व इतर नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल जास्त वाढला आहे."- नीलेश जगदीश पाटील, प्रगतिशील शेतकरी, मांडळ

"खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. मात्र, अजूनपर्यंत तो मिळाला नाही. बी-बियाणांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. यावर कृषी विभागाने योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे." - प्रा. सुभाष पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, किसान काँग्रेस

Crowd of farmers to buy seeds. In the second photo, a woman is planting cotton in Mandal.
Jalgaon Rain: पहिल्याच पावसात नववसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था! गटार अन नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे सर्वत्र चिखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.