Jalgaon Cotton Crop : अधिक कापूस उत्पादनामुळे 28 लाख गाठींची निर्मिती होणार

Cotton Crop
Cotton Cropesakal
Updated on

जळगाव : यंदा झालेला ११२ टक्के पाऊस, कापसाचा झालेला पेरा ११० टक्के यामुळे कपाशीचे यंदा विक्रमी उत्पादन येणार आहे. यामुळेच जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने यंदा २५ ते ३० लाख कापसाच्या गाठी निर्मितीचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. परतीच्या पावसाने कपाशीचे नुकसान काही प्रमाणात झाले असले, तरी उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळेच ३० लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने कापसामध्ये आर्द्रता निर्माण केली आहे.

यामुळे कपाशीचे भाव कमी झाले. सध्या सात हजार ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला आहे. दिवाळीपर्यंत कपाशीला हाच दर राहील. दिवाळीनंतर कपाशीच्या दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत.सध्या कापसाला आठ ते नऊ हजारांचा प्रतिक्विंटल दर आहे. मात्र कापसाची आवक बाजारात वाढेल तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी किती आहे व उपलब्धता किती आहे यावर दर अवलंबून असेल, असे कापूस अभ्यासक सांगतात. (Jalgaon Cotton Crop More cotton production will produce 28 lakh bales jalgaon Latest Jalgaon News)

शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ११२ टक्के पाऊस झाला. जून महिन्यातील कापसाची आता वेचणी सुरू झाली आहे. चांगल्या पावसाने उत्पादनही चांगले येणार आहे. मात्र परतीच्या पावसाने काही ठिकाणी कपाशीच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षी कपाशीला कापूस टंचाईमुळे अकरा ते तेरा हजारांपर्यंत दर मिळाला होता. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा हाती आलेला हंगाम गेला होता. जिनिंग व्यावसायिकांना कापूस न मिळाल्याने मार्च महिन्याच व्यवसाय थांबवावा लागला होता. यामुळे जिनिंग व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.

गेल्या वर्षी कापसाला मिळालेला तेरा हजारांपर्यंतचा दर पाहता यंदा शेतकऱ्यांनी दहा ते पंधरा टक्के पेरा अधिक केला आहे. यामुळे कापसाचे चांगले उत्पादन येणे सुरू झाले आहे. दिवाळीपर्यंत अधिक कापूस बाजारात येण्याची चिन्हे आहेत. कापसाला नऊ ते १० हजारांच्या दराची अपेक्षा असताना दुसरीकडे कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी सध्या कमी आहे.

कापसाची आवक वाढली अन् आंतरराष्ट्रीय कापसाच्या बाजारातील मागणी कमी राहिली तर सध्याच्या दरावर विपरीत परिणाम होऊन सात हजारांखाली कपाशीचे दर जाऊ शकतात असा धोका असल्याचे कापूस अभ्यासक सांगतात. परतीच्या पावसाने कपाशीत ओल निर्माण केल्याने कपाशीचा दर्जा खराब होत असल्याचे चित्र काही ठिकाणी आहे. मात्र यंदाचा कापूस चांगला आहे.

Cotton Crop
Diwali Festival: आयात घटल्याने फटाके दरांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ; मागणीदेखील वाढणार

आकडे बोलतात...

* दर वर्षी होणाऱ्या कापसाच्या गाठींचे उत्पादन--१८ ते २५ लाख गाठी

* गेल्या वर्षी उत्पादित गाठी--९ लाख गाठी

* खंडीला मिळालेला दर--४० ते ५० हजार

* शेतकऱ्यांना गेल्या वर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर--९ ते १३ हजार

* सध्याचा दर ७००० ते ८५००

"कापूस पिकाची सध्या चांगली स्थिती आहे. मात्र परतीच्या पावसाने कापसात ओल निर्माण झाल्याने कपाशीचे दर कमी झाले आहेत. सध्या सात ते साडेआठ हजारांचा दर आहे. दिवाळीपर्यंत अशी परिस्थिती राहील. दिवाळीनंतर कापसाच्या दरात वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे."-जीवन बयास, उपाध्यक्ष, जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशन

Cotton Crop
Healthy Plan for Diwali : ‘चटपटीत’चा टाळा मोह, पौष्टिक आहारातून सुदृढ रहा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.