Jalgaon Cotton Damage : पांढऱ्या सोन्याला भाद्रपदची ऊब; पारोळा तालुक्यात सततच्या पावसामुळे कपाशीचे नुकसान

Cotton Damage : तालुक्यात सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कापूस पिकाची लागवड केली आहे. यावर्षी उत्पन्न चांगले येईल या आशेने शेतकऱ्यांनी विशेषतः कपाशीची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली.
Cotton thrown in yard for drying in Ashok Nagar area.
Cotton thrown in yard for drying in Ashok Nagar area.esakal
Updated on

पारोळा : तालुक्यात सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कापूस पिकाची लागवड केली आहे. यावर्षी उत्पन्न चांगले येईल या आशेने शेतकऱ्यांनी विशेषतः कपाशीची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली. ऐन कपाशी काढणीला आलेली असतानाच पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवले. निघालेला ओला कापूस सुकण्यासाठी शेतकरी कापसाला भाद्रपदच्या शेवटचे ऊन सध्या दाखवत आहेत. शेतकऱ्यांनी सुरवातीपासूनच शेतात चांगली मशागत केली. (Cotton loss due to continuous rain in Parola taluka )

पिकांची काळजी घेऊन त्यांना वाढवले. निसर्गाने मात्र शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरवले. तालुक्यात कधी अवकाळी तर कधी मुसळधार झालेल्या पावसामुळे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक पूर्णपणे धोक्यात आले. अशातच भाद्रपद महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने हे ऊन ओल्या कापसाला दाखवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सध्या सुरु आहे. वेचलेल्या कापसाला ऊन, वारा लागावा यासाठी भाद्रपदचे हे अखेरचे ऊन पोषक ठरत आहे. सध्या पावसाने देखील उघडीप घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अंगणांमध्ये कापूस सुकवणे सोपे जात आहे. (latest marathi news)

Cotton thrown in yard for drying in Ashok Nagar area.
Cotton Crop Damage : कापसाला नाही भाव, कीटकांचा प्रादुर्भाव; साठवलेल्या कापसामुळे खाजेचे विकार

कडधान्य पाण्याखाली

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसासोबत आंतरपीक म्हणून कडधान्यांचा पेरा केला आहे. मात्र, वारंवार झालेल्या पावसामुळे कडधान्य देखील पूर्णपणे वाया गेल्याचे चित्र आहे. कापसामध्ये उडीद, मुंग, तूर यांची लागवड केलेली असली तरी वातावरणातील बदल व अति पावसामुळे आंतरपीक वाया गेल्याचे शेतकरी सोमा माळी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

दरम्यान, तालुक्यातील सातही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कापसाला योग्य भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी महेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर शासनाने योग्य हमी भाव जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी येथील शेतकरी संघटनांनी केली आहे.

Cotton thrown in yard for drying in Ashok Nagar area.
Jalgaon Cotton Farming : पाचोरा तालुक्यात 45 हजार हेक्टरवर कापसाचा पेरा; खरीप हंगामाची बळीराजाला उभारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.