Jalgaon Cotton : कापसाला 6,111 रुपये क्विंटलचा भाव; कुऱ्हा येथे श्रीराम जिनिंग फॅक्टरीत खरेदीचा मुहूर्त

Cotton News : यंदा पाऊस चांगला झाल्याने कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. कुऱ्हा येथील श्रीराम जिनिंग फॅक्टरीत सोमवारी (ता. ७) कापूस खरेदीचा प्रारंभ झाला.
Sandeep Khandelwal, Prateek Khandelwal, Abhishek Khandelwal etc. during cotton launch at Sriram Ginning on Monday.
Sandeep Khandelwal, Prateek Khandelwal, Abhishek Khandelwal etc. during cotton launch at Sriram Ginning on Monday.esakal
Updated on

कुऱ्हा काकोडा (ता. मुक्ताईनगर) : यंदा पाऊस चांगला झाल्याने कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. कुऱ्हा येथील श्रीराम जिनिंग फॅक्टरीत सोमवारी (ता. ७) कापूस खरेदीचा प्रारंभ झाला. मुहूर्ताच्या खरेदीसाठी प्रतिक्विंटल सहा हजार ११ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना देण्यात आला. कापूस खरेदीची सुरुवात उद्योजक संदीप खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आली. ‌( Cotton price Rs 6111 per quintal )

नवरात्रीचा शुभमुहूर्तावर कुऱ्हा काकोडा येथील श्रीराम जिनिंगमध्ये सोमवारी कपासन मातेचे पूजन करून कापसाचा प्रारंभ झाला. प्रतीक खंडेलवाल, अभिषेक खंडेलवाल, देव खंडेलवाल, प्रिन्स खंडेलवाल, शेतकरी हिरामण कोळपे, पुंडलिक सरक (राजुरा), सुळा येथील साहेबराव पाटील, धामणगावचे अनिल चव्हाण, कोऱ्हाळा येथील नंदू इंगळे, कुऱ्ह्याचे बबलू खान या शेतकऱ्यांचा ४५ क्विंटल कापूस मोजण्यात आला. कुऱ्हा-वढोदा परिसरातील शेतकरी, गणेश शर्मा, रामधन पाटील, रूपेश चांडक, अकील शाह, संदीप कडू खिरळकर, मापारी निवृत्ती भवरे आदी या वेळी उपस्थित होते. (latest marathi news)

Sandeep Khandelwal, Prateek Khandelwal, Abhishek Khandelwal etc. during cotton launch at Sriram Ginning on Monday.
Jalgaon Cotton Damage : पांढऱ्या सोन्याला भाद्रपदची ऊब; पारोळा तालुक्यात सततच्या पावसामुळे कपाशीचे नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.