Jalgaon Cotton News : कपाशीच्या दरात घसरण, मात्र बियाण्यांमध्ये वाढ; उत्पादन खर्चही मिळेना

Jalgaon Cotton : दरवर्षी खरिपाच्या तोंडावर कापसाचे दर वाढतात. मात्र, यंदा हमीभावही मिळाला नाही. कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे.
cotton
cottonesakal
Updated on

Jalgaon Cotton News : दरवर्षी खरिपाच्या तोंडावर कापसाचे दर वाढतात. मात्र, यंदा हमीभावही मिळाला नाही. कापसाच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अशा परिस्थितीत यंदा पुन्हा बीटी बियाण्यांच्या दरात पाकिटामागे ११ रुपयांनी वाढ झाली आहे. ४७५ ग्रॅमचे पाकीट ८६४ रुपयांना मिळणार असल्याने पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. सध्या कापसाचे दर सात हजार रुपयांदरम्यान स्थिरावले आहेत. (Cotton prices down but seeds price up )

मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे कापसाचे उत्पन्न घटले. उत्पादन खर्चही पदरी न पडल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. सोयाबीनचीही तीच गत झाली आहे. त्यातुलनेत तुरीला यंदा दहा ते ११ हजारांपर्यंत भाव मिळाला. त्यामुळे यंदा सोयाबीन व कपाशीची क्षेत्रात वाढ न होता तुरीच्या आंतरपिकात वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांत ८१० रुपयांवरुन बियाणे ८६७ वर

जिल्ह्यात सरसकट शेतकरी बीजी-२ बीटी बियाण्यांची लागवड करतात. दोन वर्षांपूर्वी या बियाणे पाकिटाची किंमत ८१० रुपये होती. यात ४४ रुपयांनी वाढ होऊन मागील वर्षी ८५३ रुपये झाली व या वर्षी पुन्हा पाकिटामागे ११ रुपयांची वाढ होऊन यंदा ८६४ रुपयांवर पोहोचले आहे. त्या तुलनेत कापसाचे दर मात्र कमी होत असल्याचे वास्तव आहे. (latest marathi news)

cotton
Jalgaon Cotton Crop Crisis: कापूस बियाणांच्या तुटवड्याने शेतकऱ्यांची लूट! कृषी विभाग पथके नावालाच; कापूस बियाण्यांचा तुटवडा

कापसाच्या कमी उत्पन्नामुळे यंदा मागणी वाढून दरवाढ होण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात शेतमालाच्या भावात घसरण होत आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाला १३ हजारांपर्यंत दर मिळाल्याने यंदा दरवाढ होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता.

२७ लाख ९२ हजार बियाणे पाकिटांची मागणी

यंदा कपाशीचे क्षेत्र ५ लाख ५८ हजार हेक्टवर प्रस्तावित केले आहे. यंदा खरिपात २७ लाख ९२ हजार बियाणे पाकिटांची मागणी आहे. जिल्ह्यात सरसकट शेतकरी बीजी-२ या वाणाची लागवड करतात. कापसाला सध्या साडेसहा हजार ते सात हजारांचा दर मिळत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली होती. मात्र, दरवाढ न झाल्याने साठवणुकीतील कापूस आता विक्रीसाठी येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

cotton
Jalgaon Cotton News : केवळ 15 लाख गाठींचे उत्पादन! आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी कमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.