पारोळा : मागीलवर्षी अवकाळी व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यासह पारोळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा म्हणून कापूस व सोयाबीन अर्थ सहाय्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचे आवश्यक फॉर्म कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांकडून भरुन घेतले.
मात्र, आजही हे फॉर्म या कार्यालयात धूळ खात पडून आहेत. त्यामुळे येथील स्वर्गीय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून या योजनेच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे. (Cotton Soybean financial assistance form not used)