अमळनेर : पालिकेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी झालेल्या दंगलीतील खटल्यात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी गर्दीत आरोपींना ओळखू शकलो नाही, अशी साक्ष दिली. पुढील महिन्यात खटल्याचा निकाल लागणार आहे. (Shirish Chaudhary Testimony in Amalner Riot Case)
गेल्या २७ नोव्हेंबर २०१६ ला दुपारी तीनच्या सुमारास आर. के. नगर भागात माजी आमदार शिरीष चौधरी व मंत्री अनिल पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांत मारहाण झाली. त्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील, विद्यमान मंत्री अनिल पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांच्यासह ४० ते ५० जणांचा जमाव शिरीष चौधरी यांच्या घरावर चालून गेला. तलवार, लाठ्याकाठ्या, लोखंडी सळई, दगड मारून गाड्या फोडून नुकसान केले, असा आरोप करीत शिरीष चौधरी यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
आरोपींमध्ये शहरातील प्रतिष्ठित, यात नगरसेवक राजेश पाटील, घनश्याम पाटील, बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक विक्रांत पाटील, प्रवीण साहेबराव पाटील, मनोहर पाटील आदी मान्यवरांचा समावेश होता. (latest marathi news)
आठ वर्षांपासून हा खटला सुरू होता. ३ ऑगस्टला न्यायालयात याबाबत सुनावणी होती. न्यायालयात साक्ष देताना शिरीष चौधरी यांनी तडजोड करण्याची भूमिका घेत, गर्दीत आरोपी ओळखू शकलो नाही म्हणून साक्ष दिली. येत्या ६ सप्टेंबरला या खटल्याचा निकाल लागणार आहे. शिरीष चौधरी यांच्यातर्फे ॲड. सुरेश सोनवणे व आरोपींतर्फे ॲड. यज्ञेश्वर पाटील यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.