Jalgaon Vote Counting : एका फेरीच्या मतमोजणीसाठी लागणार 20 मिनिटे; सुरवातीस टपाली मतदान मोजणार

Vote Counting : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी मंगळवारी (ता. ४ जून) होणार आहे.
Vote Counting
Vote Countingesakal
Updated on

Jalgaon Vote Counting : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची मतमोजणी मंगळवारी (ता. ४ जून) होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, ४ जूनला सकाळी सातला मतदान यंत्र ठेवलेले सुरक्षा कक्ष उमेदवार किंवा उमेदवार प्रतिनिधींच्या समक्ष उघडण्यात येईल. सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार असून, सुरवातीला टपाली मतदान मोजले जाईल. नंतर प्रत्यक्ष मतमोजणीच्या फेऱ्या सुरू होतील. ()

एका फेरीला किमान २० मिनिटे लागू शकतील. मतमोजणी अत्यंत पारदर्शक वातावरणात पार पडणार असल्याने उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या १३ मेस शांततेत व सुरळीतपणे मतदान झाले होते. रावेर मतदारसंघात ६४.२८ टक्के, तर जळगाव मतदारसंघासाठी ५८.४८ टक्के मतदान झाले. मतदानानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

गुरुवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार, पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया समजावून सांगितली. (latest marathi news)

Vote Counting
Lok Sabha Election: 'ना मी निष्पक्ष, ना प्रशांत किशोर; योगेंद्र यादवांनी स्वत:च केली भविष्यवाणींची पोलखोल

तीन पदरी सुरक्षा व्यवस्था

४ जूनला सकाळी सातला मतदान यंत्रणांचे सील उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींसमोर उघडण्यात येईल. मतमोजणी स्थळी तीन पदरी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. मतमोजणी स्थळी प्रवेश करण्यासाठी उमेदवारांना ओळखपत्र बंधनकारक आहे. ओळखपत्राशिवाय कोणालाही मतमोजणी स्थळी प्रवेश मिळणार नाही.

मोबाईल नेण्यास बंदी

मतमोजणी कक्षात मोबाईल आणण्यास बंदी असल्यामुळे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींना मोबाईल आणता येणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींसमोर सर्व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याने उमेदवारांनी त्यांचे कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी होईल मतमोजणी

प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्यापूर्वी टपाली मतमोजणी होणार आहे. किमान एक फेरी २० मिनिटांची असणार आहे. उमेदवारांना निवडणुकीचा अंतिम खर्च निकालानंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी २७ जूनला अल्पबचत भवनात प्रशिक्षण होणार आहे. ३० जूनला खर्चाचा अंतिम ताळमेळ घेतला जाणार आहे.

Vote Counting
Vote Counting : मतमोजणीसाठी पोलिसांकडून आढावा सुरू; 4 जूनला मतमोजणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com