Jalgaon Cyber Crime : फेसबुकवर लिंक पाठवून निंबोल (ता. रावेर) येथील डॉक्टराला सायबर भामट्यांनी हेरले. ग्रुपद्वारे डॉक्टराला शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून गेल्या तीन महिन्यांत तब्बल २० लाखांची वसुली केली. गुंतवणूक परतावा, म्हणून केवळ ९६ हजार देऊन फसवणूक केली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Jalgaon Crime)
निंबोल येथील डॉ. पंकज विश्वासराव पाटील (वय ४४) यांच्या फेसबुक खात्यावर १९ डिसेंबरला एक लिंक पाठविली व Jonathan Simon Investwise Chronicles Club आणि AlpAxis Pro one-to-one Service या ग्रुपमध्ये ज्वाईन करून घेतले.
त्यांनतर ग्रुप ॲडमिनद्वारे शेअर बाजार गुंतवणुकीचे अमिष दाखवून वेळोवेळी तब्बल २० लाख रुपये उकळण्यात आले.
गुंतवणूक केल्यावर परतावा आणि शेअर बाजारातील स्टेट्स तपासल्यावर कुठलीच माहिती मिळेना, म्हणून संबंधित सायबर भामट्यांना संपर्क केला असता, त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीतून ९६ हजार रुपये मिळविल्याचा बनाव करून ते परत केले.
उर्वरित १९ लाख चार हजार रुपयांची रक्कम लाटल्याचे निदर्शनास आल्यावर डॉ. पंकज पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.