पहूर/शेंदुर्णी (ता. जामनेर) : शेंदुर्णी (ता. जामनेर) येथे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास किरकोळ वादावरून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल करून संशयितांविरुद्ध धडक कारवाई करण्यास सुरू केली आहे.
गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, दोन्ही गटाकडील २५ संशयितांवर दंगल आणि पोलिसांवर प्राणघातक हल्ला व शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (25 persons charged in Shendurni stone pelting case)