जळगाव : पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनासाठी जळगावात आणणाऱ्या यावलच्या संशयिताला जिल्हापेठ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ९८ हजार ५०० रुपयांच्या ९७ बनावट नोटा जप्त केल्या होत्या. या प्रकरणात बनावट नोटा देणाऱ्या एजंटला पोलिसांनी अटक केली.
त्याची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी आणखी बनावट नोटा चलनात आणणाऱ्या नरजील नासीर खान (वय ३०, रा. जामनेर) व गनी मजीद शेख (वय ४७, रा. तोंडापूर, ता. जामनेर) या संशयितांना अटक केली असून, त्यातील नरजील खान याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. (4 arrested in syndicate case of fake notes)
बनावट नोटा चलनात आणण्यासाठी एक संशयित शहरात आल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली होती. जिल्हापेठ पोलिसांनी सापळा रचत रचून बुलेटवर आलेल्या संशयित चेतन शांताराम सावकारे (वय २७, रा. यावल) याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ९७ हजार ५०० रुपयांच्या पाचशे रुपयाच्या नकली नोटांचे बंडल जप्त करण्यात आले होते.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून, जप्त केलेल्या बनावट नोटा त्याचा गावातील नईम बदरुद्दीन शेख याच्याकडून घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयित नईम शेख याला यावलमधून अटक करण्यात आली. (latest marathi news)
दोघांकडून नोटा जप्त
पोलिस कोठडीत असताना त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, नईम बदरुद्दीन शेख याची चौकशी करीत असताना त्याने बनावट नोटा जामनेर येथील भंगार व्यावसायिक नरजील नासीर खान व तोंडापूर येथील गनी मजीद शेख यांना दिल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून १३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
बनावट नोटांचे ‘सिंडिकेट’
बनावट नोटा प्रकरणात आतापर्यंत चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तीन जणांना यावल येथील नईम बदरुद्दीन शेख याने बनावट नोटा पुरविल्याचे चौकशीत उघड झाले आहे. अटकेतील दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
न्यायालयाने अटकेतील चौघांना १६ ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावली असून, या चौघांच्या चौकशीतून बनावट नोटांचे सिंडिकेट नेमके कोण चालवतोय याचा पोलिस शोध घेत आहे. गुन्ह्यातील म्होरक्याच्या अटकेसाठी पोलिसांनी दोन वेळा मध्य प्रदेशातही सापळा रचला होता. मात्र, संशयित हाती लागला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.