Jalgaon Crime News : पारोळ्यात 4 घरफोड्या; दीड लाखांचा ऐवज लंपास

Jalgaon Crime : शिवकॉलनीत बंद घर फोडून चोरट्याने दीड लाख रुपये लंपास केले. इतर तीन घरांमध्येही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.
Luggage misplaced by thieves.
Luggage misplaced by thieves.esakal
Updated on

Jalgaon Crime News : येथील शिवकॉलनीत बंद घर फोडून चोरट्याने दीड लाख रुपये लंपास केले. इतर तीन घरांमध्येही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. शिवकॉलनीतील रहिवासी व सैन्य दलातील जवानाच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्या काकांचे मंगळवारी (ता. १८) निधन झाल्याने त्या घराला कुलूप लावून मुलांसह नरडाणा (ता. शिंदखेडा) येथे अंत्यविधीसाठी गेल्या होत्या. ( 4 house burglaries in Parola one lakh in lieu of loot)

घर बंद असल्याचा फायदा घेत मध्यरात्री चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोंडून घरात प्रवेश केला. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून कपाटातून सोन्याची चेन, अंगठी, चांदीच्या वस्तू, रोख दीड लाख घेऊन पसार झाले.

Luggage misplaced by thieves.
Jalgaon Crime News : डांभुर्णी रस्त्यावरील शेतातून 21 खांबांवरील वीजतारांची चोरी

चोरटे एवढ्यावरच न थांबता जूला राहत असलेले प्रभाकर रुपा राठोड, रुखमाबाई गोपाल महाजन, जोरसिंग मंगतू पवार यांचेही बंद घराचे कुलूप तोडून रोकड व इतर वस्तू चोरून नेल्याचे समजते. मात्र, ही मंडळी बाहेरगावी असल्याने किती रक्कम चोरीला गेली, हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Luggage misplaced by thieves.
Jalgaon Crime News : पत्नीने दिराच्या मदतीने पतीला संपवले; चाळीसगाव पोलिसांकडून पत्नीला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.