Jalgaon Crime News : जामनेरला 4 लाखांचा गुटखा पकडला; संशयितासह कार ताब्यात

Jalgaon Crime : पोलिसांनी संशयित कारमधून चार लाख रुपये किमतीचा अवैध तंबाखू-गुटखा पकडला.
Police Inspector Kiran Shinde and staff along with the suspects The second photo shows the car used in the crime.
Police Inspector Kiran Shinde and staff along with the suspects The second photo shows the car used in the crime.esakal
Updated on

Jalgaon Crime News : येथील पोलिसांनी संशयित कारमधून चार लाख रुपये किमतीचा अवैध तंबाखू-गुटखा पकडला. सोबतच गुटखा वाहतूक करणाऱ्या संशयितासह वाहनही ताब्यात घेतले. विशेष म्हणजे कोणालाही शंका येऊ नये म्हणून गुटखा तस्करीसाठी कारचा वापर करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता. २८) दुपारी तीनच्या सुमारास करण्यात आली. जामनेर पोलिसांना स्विफ्ट डिझायर कारमध्ये गुटखा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. (4 lakh Gutkha caught from Jamner car seized with suspect)

या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत संशयित वाहनाचा पाठलाग करण्यासाठी सापळा रचला. कारची झडती घेतली असता अंदाजे चार लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. याबाबत पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पवन मोहन गोसावी (रा. मुक्ताईनगर) असे कारचालकाचे नाव आहे. जळगाव रोडवरील मराठा मंगल कार्यालय रस्त्यावर पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात पवन गोसावी अडकला.

Police Inspector Kiran Shinde and staff along with the suspects The second photo shows the car used in the crime.
Jalgaon Crime News : व्याजाच्या पैशांसाठी मुलीचा विनयभंग; पैसे वसुलीसाठी शिक्षकाने सोडली पातळी

चोरी-छुपी विक्रीसाठी तो गुटखा दुकानात नेत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता विमल आणि इतर नावांचा पानमसाला आणि सुगंधी तंबाखू साठा असा सुमारे गाडी मध्ये ४ लाख २९ हजार ९५० रुपयांचा गुटखा, पान मसाला आणि तंबाखू जन्य पदार्थासह ४ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण ९ लाख २९ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पत्रकार प्रदीप गायके यांच्या सतर्कतेमुळे जामनेरात लाखो रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. जामनेर पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर काळे, नीलेश घुगे, तुषार पाटील, अमोल पाटील, संजय खंडारे, होमगार्ड दीपक खंडारे यांनी कारवाई केली आहे.

Police Inspector Kiran Shinde and staff along with the suspects The second photo shows the car used in the crime.
Jalgaon Crime News : जळगाव शहर अंमली पदार्थांच्या विळख्यात; 2 पोलिस ठाण्यात एकाच दिवसांत 7 गुन्हे दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.