Jalgaon Crime News : जामनेर पोलिस ठाणे हल्लाप्रकरणी आणखी 5 अटकेत

Crime News : पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त असून, त्यांच्या जागी विजय शिंदे यांची प्रभारी म्हणून नेमणूक केल्याचे समजते.
Local Crime Branch PSI Vishal Patil, Kishore Rathod, Sachin Mahajan, Ranjit Jadhav etc. while taking the suspects to the court.
Local Crime Branch PSI Vishal Patil, Kishore Rathod, Sachin Mahajan, Ranjit Jadhav etc. while taking the suspects to the court. esakal
Updated on

जामनेर : पोलिस ठाण्यावर हल्ल्याप्रकरणी आणखी पाच संशयितांना अटक झाली असून, संशयितांची संख्या आता २२ झाली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित शालूसिंग शेवाळे घटनेनंतर फरारी झाला असून, एलसीबी पथकाच्या हाती तो अद्याप लागलेला नाही. दरम्यान, पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे खात्रीलायक वृत्त असून, त्यांच्या जागी विजय शिंदे यांची प्रभारी म्हणून नेमणूक केल्याचे समजते. (Crime 5 more arrested in Jamner Police Station attack)

Local Crime Branch PSI Vishal Patil, Kishore Rathod, Sachin Mahajan, Ranjit Jadhav etc. while taking the suspects to the court.
Nagpur Crime : अपहरण करून फेकले विहिरीत;जुन्या भांडणातून काढला युवकाचा काटा

उमेश रमेश शेवगे (वाकी खुर्द), आकाश रघुनाथ सोनवणे, दुर्गेश हिरामण ठाकरे, मोहन प्रभाकर भिल, संजय साहेबराव सोनवणे (हिवरखेडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी (ता. २०) रात्री साडेआठच्या सुमारास हजार-दीड हजार लोकांच्या जमावाने लाठ्या काठ्या व दगड धोंड्यांनी पोलिस ठाण्यावर हल्ला केला.

यात आठ-दहा पोलिस गंभीर जखमी झाले. आतापर्यंत फक्त तीनशे ते चारशे अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला असून, १८ संशयितांना अटक झाली आहे. पहिले तीन संशयित फरारी आहेत.या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे देण्यात आला आहे.

Local Crime Branch PSI Vishal Patil, Kishore Rathod, Sachin Mahajan, Ranjit Jadhav etc. while taking the suspects to the court.
Jalgaon Crime News : अमळनेरात धार्मिक स्थळाची तोडफोड! पोलिसांनी संशयिताला पकडल्याने शहरात शांतता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.