चोपडा : मध्य प्रदेशातून चोपडा शहरात कत्तलीसाठी गुरांच्या पाच पिकअप गाड्या येत असल्याच्या गोरक्षकांच्या माहितीवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईत आज शुक्रवारी (ता.५) पहाटे पाचच्या ५२ जनावरे हस्तगत केली. चोपडा ते नागलवाडी रस्त्यावर पाच गाड्यांमधून या ५२ गुरांची अवैध वाहतूक रोखण्यात गो रक्षकांना यश मिळाले. चोपडा शहरात दरमहा अशा लहान मोठया कारवाया नेहमी होत असताना कत्तलीसाठी गुरांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक अवैध मार्गाने सुरू आहे. (Jalgaon Crime)
त्याकडे पोलिस प्रशासनाचे मोठे दुर्लक्ष असून गोरक्षा करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या गाड्या पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्या होत्या. त्या पाचही गाड्या चालकाविरुद्ध चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आंतरराज्य टोळ्या
आज शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास मध्यप्रदेशातून चोपड्याच्या दिशेने पाच पिकअप गाड्या मध्ये अवैधपणे गुरांच्या भरलेल्या गाड्या येत असल्याची माहिती स्थानिक गोरक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली होती. अत्यंत निर्दयपणे,गाई,बैल , लहान वासरांना कोंबून त्यांना इजा होईल अशा अमानुष पद्धतीने गाड्यांत जनावरे भरण्यात आले होते.
पुढे गुरे आणि मागे चारा भरून गाड्या चोपड्याच्या दिशेने जाताना गोरक्षकांनी नागलवाडी गावात गाड्या पकडल्या. पोलिसांच्या मदतीने पाच गाड्यांमधून एकूण ५२ गुरांची सुटका करण्यात आली आहे.
चोपडा शहर पोलिस ठाण्यात शिपाई प्रमोद पवार यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणात ५२ गुरे ताब्यात घेण्यात आले असून पाच पिकअप बोलेरो गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत,एक लाख साठ हजार रुपये किमतीचे ५२ गुरे व पंधरा लाख रुपये किमतीचे एकूण पाच बोलेरो गाड्या असा एकूण १६ लाख ६० हजार रुपये किमतीची कारवाई पोलिसांनी केली आहे. पुढील तपास जितेंद्र सोनवणे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.