Jalgaon Crime News : चार घरफोड्यांत 7 लाखांचा ऐवज लंपास; बाहेरगावी गेलेल्यांच्या घरी घरफोड्या

Crime News : घरी आल्यावर कपाटातील पाच लाख चोरट्यांनी गायब केल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.
Household items misplaced by thieves
Household items misplaced by thievesesakal
Updated on

अमळनेर : घरमालक गावाला गेल्याची संधी शोधत चोरट्यांनी तालुक्यात चार ठिकाणी घरफोडी करून सुमारे सव्वासात लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. (7 lakh stolen in four house burglaries)

धुपी, मुंदडानगर व विद्यानगर भागांत चोरट्यांनी चार घरे फोडली. धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव यांनी कपाशी, दादर, हरभरा विकून आलेले, तसेच पशुखाद्य व्यवसायातील पाच लाख रुपये आठवडाभरापूर्वी लोखंडी कपाटात ठेवून ते नाशिकला गेले असताना, मंगळवारी (ता. ११) त्यांना घरफोडी झाल्याचा फोन आला. घरी आल्यावर कपाटातील पाच लाख चोरट्यांनी गायब केल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या घटनेत मुंदडानगरमधील नरेंद्र प्रकाश सूर्यवंशी त्यांच्या खवशी मूळगावी गेले असताना, बुधवारी त्यांना सकाळी शेजारी प्रवीण शालिग्राम पाटील यांच्याकडून घरफोडीची माहिती मिळाली. त्यांच्या घराचा कडीकोंयडा तोडून चोरट्यांनी कपाटातील ५० हजार रुपये आणि तीन हजाराचा चांदीचा गणपती, चांदीची देवीची मूर्ती, चांदीच्या साखळ्या, जोडवे, चांदीचे कडे, असा एकूण ६९ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हवालदार संतोष पवार तपास करीत आहेत. (latest marathi news)

Household items misplaced by thieves
Nashik Fraud Crime : मयताची 19 लाखांची पॉलिसी ठकबाजाने गंडवली! बनावट कागदपत्राद्वारे विमा कंपनीला लावला चुना

संत सखाराम महाराजनगरला घरफोडीचा तिसरा प्रकार उघडकीस आला. हुकूमचंद शांताराम पाटील यांची मुलगी आजारी असल्याने ते मंगळवारी दवाखान्यात गेले होते. बुधवारी सकाळी साडेसातला त्यांच्या पत्नी घरी आल्या असता, त्यांच्या घरचा कडीकोंयडा तोडून चोरट्यांनी घरातील ३० हजार रुपये रोख, २० हजार रुपयांचा लॅपटॉप, ४ हजारांचा मोबाईल, सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या मूर्तीसह, तसेच त्यांच्याशेजारील रहिवासी विजय वाडेकर यांची बाहेर लावलेली दुचाकी (एमएच १९, बीएन ००८२), असा १ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आढळले.

"सर्व घरफोड्या घरमालक बाहेरगावी गेल्यानंतर घडल्या आहेत. नागरिकांनी बाहेर जाताना शेजारी व इतरांना सांगून जावे. मौल्यवान वस्तू सुरक्षितस्थळी किंवा सोबत घेऊन जावे."

-सुनील नंदवाळकर, पाेलिस उपअधीक्षक, अमळनेर

Household items misplaced by thieves
Pune Crime : पुणे शहरात बलात्काराच्या पाच घटना आल्या उघडकीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.