Jalgaon Crime News : 8 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून विक्री; अल्पवयीन मुलांच्या मदतीने घरातून पळविले बाळ

Jalgaon News : मुंबईच्या निसंतान दांपत्यास हवे असलेल्या बाळासाठी भुसावळच्या अनाथाश्रमच्या संचालिकेने सौदा ठरविला.
Crime
Crime esakal
Updated on

Jalgaon Crime News : मुंबईच्या निसंतान दांपत्यास हवे असलेल्या बाळासाठी भुसावळच्या अनाथाश्रमच्या संचालिकेने सौदा ठरविला. गुन्हेगारांना लावून अल्पवयीन मुलांच्या मदतीने साकेगाव येथील झोपडीतून बाळ पळवून ते साडेतीन लाखांना विक्री केले होते. गुन्हे शाखा व भुसावळ पोलिसांनी मुंबईपर्यंत पिच्छा पुरवत चिमुरड्याचा शोध घेतला. (Jalgaon Crime 8 month old baby kidnapped and sold)

अखेर पोलिसांची भनक लागल्याने दत्तक दांपत्याने ते बाळ परत आणून अनाथाश्रमाला दिले. तपासाअंती अनाथाश्रम संचालिका, तिचा साथीदार पोलिसासह पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद अर्जुन भिल पुन्हा मुळ आईवडिलांच्या कुशीत सुखरूप पोहचविण्यात पोलिस दलास यश आल्याची माहिती जिल्‍हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

साकेगावात आठ महिन्याच्या चिरमुडा अरविंद्र अर्जुन भिल मंगळवारी (ता. २३) रात्री दोनच्या सुमारास घरातील झोक्यात झोपला होता. त्याला झोक्यातून उचलून अपहरण केले होते. याबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी स्वतः यात जातीने लक्ष घातले.

स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील व त्यांचे पथक, भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन जगताप व गोपनिय खात्याचे कर्मचारी तपासात जुंपले. पथकाने महामार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची धुंडाळणी करत तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. भुसावळच्या एका अनाथाश्रमाच्या संचालिकेची माहिती मिळाल्यावर तपासाला वेग आला.

Crime
Crime News : मलठण येथे हाणामारीत एकाचा मृत्यू

पथके मुंबईला

साकेगाव येथून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून भुसावळ येथील एका महिलेने बाळाचा सौदा पाच लाखांत केल्याची माहिती मिळाल्यावर पथक मुंबईला रवाना झाले. पोलिसांनी बाळाचा शोध सुरू केल्याची भनक मुल दत्तक घेणाऱ्या दांपत्याला लागल्यावर त्यांनी ते बाळ आणून भुसावळ येथील अनाथाश्रमाच्या संचालिकेस सोपवले.

अन्‌ बाळ मिळाले

पथकाने माहितीवरुन भुसावळ शहरातील नारायणनगरातील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन संचलीत अनाथाश्रमावर छापा टाकला. त्यात अपहरण झालेले आठ महिन्याचे बालक मिळून आले. अनाथाश्रमात मिळालेले बाळ तेच असल्याची खात्री झाल्यावर कायदेशीर प्रकिया पूर्ण करून बाळ आईच्या स्वाधीन करण्यात आले.

Crime
Nashik Crime : कपाटाची चावी बनवून देण्याच्या बहाण्याने लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला; मनमाडच्या गांधी चौकातील घटना

संशयितांना अटक

संशयितांचा शोध घेत पोलिसांनी दीपक रमेश परदेशी (वय ३२, रा. नारायणनगर, भुसावळ), अमित नारायण परिहार (३०., रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ), कुणाल बाळू वाघ (१९, रा. साकेगाव, ता. भुसावळ), बाळू पांडुरंग इंगळे (५१ रा. वरणगाव ता. भुसावळ) आणि अनाथाश्रम चालविणारी रिना राजेंद्र कदम (४८ रा. नारायणनगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आली आहे. शिवाय या गुन्ह्यातील एक आणि दोन विधीसंघर्षीत बालकाचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसावर कारवाई होणार

अटकेतील बाळू इंगळे नंदुरबार पोलिस दलातील कर्मचारी असून, अनाथाश्रम संचालिका रिना राजेंद्र कदम याच्याशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याने बाळाचे अपहरण झाल्यावर हे बाळ मुंबईपर्यंत घेऊन जाण्यात त्याचा मोठा वाटा राहिल्याचे तपासात उघड झाले. नंदुरबार पोलिस अधीक्षकांना याबाबत लेखी अहवाल पाठवला जाईल आणि धर्मदाय आयुक्तांनाही गुन्ह्याचा अहवाल पाठवून भुसावळातील त्या अनाथाश्रमावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

Crime
Mumbai Local Crime: चेष्टामस्करी करण्याच्या वादातून धावत्या लोकलमध्ये मित्रावर चाकूहल्ला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.